बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव 2023 ची कार्यकारी जाहीर* अभय श्रीकृष्ण पावडे अध्यक्ष तर महेश प्रभाकर चेकेटकर यांची उपाध्यक्षपदी निवड

बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव 2023 ची कार्यकारी जाहीर
* अभय श्रीकृष्ण पावडे अध्यक्ष तर महेश प्रभाकर चेकेटकर यांची उपाध्यक्षपदी निवड 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलडाणा अर्बन परिवाराकडून बुलडा lणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली यंदाच्या दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता मंडळाच्या वतीने मर्यादित स्वरूपात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे वतीने दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
गणेश मंडळाचे यावर्षी 22 वे वर्ष असून यावर्षी 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
       गणेश उत्सवानिमित्त संस्थेने गणेश उत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक  अनंता भाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये अध्यक्ष अभय पावडे तर उपाध्यक्ष महेश चेकेटकर, सचिव संजय राजगुरे, सहसचिव अजय पाटील, कोषाध्यक्ष कैलास मिश्रा, सदस्य सर्वश्री अजय कराळे, दिगंबर डवळकर, अनिल महाले, नरेंद्र शर्मा, संजय कुलकर्णी, निलेश बनसोडकर, सौ. लीना कुलकर्णी, श्रीमती मंजुषा कुलकर्णी, सौ. स्वाती देशमुख, कु. निशा वैष्णव, अरुण देशपांडे, सुनील जाधव, कैलास पवार, कैलास निकम, प्रशांत घुसळकर, निलेश जोशी, संतोष थोरात, संजय खंडारे, गिरीश मेहुणकर, विजय डोईफोडे, विक्रांत सराफ, सुधाकर मानवतकर, परमेश्वर शिंदे यांचा समावेश आहे.
      19 सप्टेंबर रोजी बुलडाणा अर्बन मुख्यालयाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या  मंडपात श्रींची स्थापना करण्यात येणार आहे. 20 सप्टेंबर रोजी सकाळी अर्थवशिर्ष पठण होणार आहे. दुपारी इयत्ता 5-7 या विद्यार्थीसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे तर  25 सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांसाठी वृक्षारोपण वृक्ष लावा- बक्षिस मिळवा या धरतीवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दि.27 सप्टेंबर बुलडाणा अर्बन कर्मचारी ऑर्केस्ट्रा सांयकाळी 7 वाजता गोवर्धन इमारत येथे होणार आहे. 
     बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या  विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचा लाभ शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष  अभय पावडे, सचिव संजय राजगुरे व गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.