आरडव येथील जि. प. शाळेवर कायम स्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान* गट विकास अधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्यांची भरवली शाळा

आरडव येथील जि. प. शाळेवर  कायम स्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
* गट विकास अधिकारी  यांच्या दालनात विद्यार्थ्यांची भरवली शाळा  
लोणार : (एशिया मंच वृत्त)
     तालुक्यातील आरडव येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या अडीच वर्षापासून कायम स्वरूपी शिक्षक नसल्याने  त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे संतापलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांसोबत थेट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यु. एस. देशमुख यांच्या दालनात विद्यार्थ्यांची 31 ऑगस्ट 2023 रोजी शाळा भरवली.
    आरडव  येथील पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांचे कारण समोर करून घेतलेल्या निर्णयामुळे पंचायत समिती च्या कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. पालक व विद्यार्थ्यांनी जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा हट्ट धरल्याने गट विकास अधिकारी देशमुख यांच्या दालनात एक प्रकारे धरणे आंदोलन केल्याचे दिसून आले. 
      यावेळी विद्यार्थ्यां सोबत सामाजिक कार्यकर्ते शैलेश सरकटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर ढ़ाकने, विनोद सरकटे, शरद मोरे, जगदीश नरवाड़े, कडूजी मोरे, अरुण मोरे, अनिल येवले, शेषराव मोरे, रामप्रसाद ढाकने, तुकाराम आघाव, किशोर काळे, स्वप्निल मोरे, पंढरी मोरे, कैलास ढाकने इत्यादि पालक उपस्थित होते.
      यावेळी पालकांनी घेतलेल्या हट्टामुळे  सहाय्यक गट विकास अधिकारी शरद घुगे, केंद्र प्रमुख जंगलसिंग राठोड सर, संतोष मुंढे , गजानन कुंभारे , पंचायत समितीचे अधीक्षक रवींद्र मापारी यांनी पालकांची अडचण  लक्षात घेऊन जांबुल जिल्हा परिषद शाळेवरील अतिरिक्त शिक्षक विष्णु भिवाजी तारे यांची आरडव येथील शाळेवर तात्काळ नियुक्ती केल्यामुळे आता त्यांची शैक्षणिक अडचण दूर होणार असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.