तांडावस्ती मध्ये जाऊन रक्षाबंधन सण केला साजरा * ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचा स्तुत्य उपक्रम

तांडावस्ती मध्ये जाऊन  रक्षाबंधन सण केला साजरा 
* ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचा स्तुत्य उपक्रम
सिंदखेडराजा : (एशिया मंच वृत्त)
      भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली  बुलडाणा जिल्ह्यात सचिनभाऊ खंडारे समितीचे नागपूर विदर्भ विभाग उपाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम राबविण्यात आला. बहिण भावाचे नाते जपणारा आणि बहिणीची रक्षा करण्यासाठी वचन देणारा हा रक्षाबंधन सण आहे ! ..परंतु आज समाजामध्ये अशा अनेक बहिणी आहे की त्यांना भाऊ नाही किंवा राखी बांधण्याकरीता त्या भावाकडे जाऊ शकत नाही. म्हणून अशा बहीनींना माणुसकी सोशल फाउंडेशन द्वारा संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती 'बुलडाणा यांच्या वतीने 'सिंदखेडराजा तालुक्यातील वंचित असलेले गाव म्हणजेच रामनगर जनुना तांडा 'येथे जाऊन विदर्भ उपाध्यक्ष सचिन खंडारे, बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष बबन सरकटे, सिंदखेडराजा तालुका उपाध्यक्ष विठ्ठल राठोड, चिखली तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वायाळ, सिंदखेडराजा तालुका मुख्य संघटक अरुण तौर यांनी दुर्बल घटकातील महिलांसोबत खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सण साजरा केला.
       दादाभाऊ  केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा व रामनगर जनुना तांडा येथील महिलांना एकुण २५ साडी चोळी व २० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले.हे गाव ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीने दत्तक घेतले असून दिवाळीमध्ये सुद्धा दिडशे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणार असल्याचे मानस त्यांनी व्यक्त केला.  
      यावेळी सचिन खंडारे, बबन सरकटे, अरुण तौर, ज्ञानदेव वायाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थितांमधे माजी उपसरपंच सौ.सुमनबाई चव्हाण, दिनकर चव्हाण, श्रीराम राठोड, बंन्सी राठोड, शिवाजी राठोड, बळीराम राठोड, कृष्णा चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, गुलाब चव्हाण, गजानन प्र.चव्हाण, दिनकर हा.चव्हाण, पंजाब प्र.राठोड, संजय दासु राठोड यांच्या सह असंख्य महिला व पुरुष हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विठ्ठल राठोड यांनी केले.