संभाजीनगर येथे होणाऱ्या पांढरे वादळ महामोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हा : राजेश राठोड

संभाजीनगर येथे होणाऱ्या पांढरे वादळ महामोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हा : राजेश राठोड 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      मूळ विमुक्त व भटक्या समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा होण्यासाठी राज्यभरातील मागासवर्गीय समाजातील नागरिकांनी येत्या 23 ऑगस्ट 2023 रोजी संभाजीनगर येथील पांढरे वादळ महामोर्चात सामील होण्याचे आव्हान आरक्षण बचाव संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेश राठोड यांनी केले आहे. 
       देशात आपल्या वेगळ्या संस्कृतीचे जीवन जगणाऱ्या बंजारा समाज हा बोलीभाषा पोशाख सण उत्सव आपल्या धाटीने पूर्ण भारतभर साजरा करत असतो मुळात व्यापार करणारा हा समाज इंग्रजांच्या बंडाचे निशाण फडकवून इंग्रज राजवटीच्या विरोधात मोठ्या ताकतीने लढत असताना गनिमीक्यावाने इंग्रजांनी बंजारा समाजाच्या माती नॉन क्रियेसारख्या काळा कायदा टपका ठेवल्याने स्वातंत्र्योत्तर काळातही विविध समाजाची वर्षानुवर्ष अपेक्षा करणाऱ्या आणि जात चोरांना दार्जिल असलेल्या व संवेदनशील राज्य सरकारच्या मेंदूत संवेदना जगण्यासाठी आणि मूळ विमुक्त व भटक्या समाजावर होणाऱ्या सततच्या अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी सर्व संघटना येत्या 23 ऑगस्ट रोजी रस्त्यावर उतरत आहे.
       बंजारा समाजाच्या अस्मितेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून पांढरे वादळ महामोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आरक्षण बचाव संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेश फकीरा राठोड यांनी केले आहे.
      संभाजीनगर  येथील क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणाऱ्या या मोर्चाचा विषयाची अतिशय गंभीर असून बंजारा व विमुक्त जातीच्या अस्तित्वाचे आहे. या मागासवर्गीय समाजाचे आरक्षण अबाधित राहण्यासाठी राज्यभरातील समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान राजेश राठोड यांनी केले आहे.