विनयभंग केल्याच्या आरोपातून तरूण निर्दोष* ॲड.निलेश सवडदकर यांचा युक्तीवाद

 विनयभंग केल्याच्या आरोपातून तरूण निर्दोष
* ॲड.निलेश सवडदकर यांचा युक्तीवाद
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     बुलडाणा शहरातील चिंचोले चौपाटीवर नोव्हेंबर २०१९ मध्ये एक अल्पवयीन मुलगी पाणीपुरी खान्याकरिता गेली होती. त्या ठिकाणी एका तरुणाने तिचा पाठलाग करित तिला वाईट उद्देशाने तिचा हात धरून सोबत बळजबरी येण्यास प्रवृत्त केले असा आरोप या तरुणीने सदर तरुणावर लावला होता.
     तरुणीच्या तक्रारीवरून सदर तरुणाविरूध्द भादवी कलम ३५४, ३५४ अ, ३५४ ड व कलम ८ आणि १२ पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे सदरचा खटला हा मा. विषेश जिल्हा व सत्र न्यायालय बुलडाणा येथे विशेष खटला म्हणून चालविण्यात आला होता. आरोपीच्या वतीने ॲड. निलेश सवडदकर यांनी जोरदार प्रखर युक्तवाद सादर करून सदर तरुणाच्या बाजूने सर्व पुरावे व साक्ष पाहाता विद्यमान न्यायालयाने सदर युवकाची या आरोपातून ११ ऑगस्ट २०२३ रोजी सत्र न्यायाधीश श्री. मेहेर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

या निकालानंतर ॲड. सवडतकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव  होत असून ॲड. सवडदकर हे नेहमीच चर्चेत राहणारे सुप्रसिध्द विधिज्ञ असून गोर-गरीब सामान्य जनतेचे ते कैवारी असल्यासारखे जिल्हा न्यायालयात काम करतात. अगदी कमी वेळात त्यांनी जिल्हा न्यायालयात आपली वेगळी छबी निर्माण केली असून सर्व सामान्य नागरिक त्यांच्याकडे आपल्याला याच वकीलाकडून न्याय मिळु शकतो या भावनेने येत असून त्यांच्या कार्यालयात सतत न्यायालयीन कामकाजासाठी लोकांची गर्दी बघायला मिळते.