बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा वारसा सांगणाऱ्या प्रबोधनकारी बहुजन विचारांची चळवळ तेवत ठेऊन त्यांचे विचार जगभर पेरणारा त्यांच्या विचारांचा खराखुरा समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी सतत धडपडणारा विचारवंत बहुजन चळवळीतला तारा, महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राज्य सरकारच्या विविध समित्यांचे सदस्य दिवंगत प्रा. हरी नरके सरांच्या बाबतीत काही विकृत विचार सरणीचे लोक सोशल मीडियावर लिखाण करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बहुजन चळवळीत काम करणारे पुरोगामी विचार पेरणारी आंबेडकरी जनतेने केली आहे. याकरिता बुलडाणा जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत आज 14 ऑगस्ट 2023 रोजी निवेदन व तक्रार देण्यात आली .
निवेदनात पुढे नमूद आहे की, अशा विकृत प्रवृत्तीवर वेळीच अंकुश ठेवावा अन्यथा ही कुप्रवृत्ती समाजासाठी हानीकारक ठरेल.या लिखाण करणारांविरूद्ध कारवाई करण्यात जर शासनाकडून दिरंगाई होत असेल तर प्रा. हरी नरके सरांवर प्रेम करणारे त्यांचे अनुयायी आपल्या पद्धतीने धडा शिकलतील असा इशारा सुद्धा निवेदनातुन देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देतांना प्रा.सदानंद माळी, अशोक दाभाडे ,शाहीर डी. आर. इंगळे, ॲड.प्रविण सुरडकर, पुरुषोत्तम बोर्डे , गणेश खरात , सुनिल गवते , विलास खंडेराव, प्रशांत सोनोने , अॅड दिपक मापारी , अंबादास तायडे ,उत्तमराव बाजड , अॅड गुणवंत नाटेकर ,अॅड शेषराव काळे ,गौतम मोरे व बहुजन चळवळीतील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
