श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न * करिअरच्या संधीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न 
* करिअरच्या संधीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 
नांदुरा : (एशिया मंच वृत्त)
     स्थानिक श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सन 2021 - 22 वर्षीचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा 10 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालयातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख सभागृहामध्ये पार पडला. 
     श्री. शिवाजी शिक्षण संस्था संचालित श्री. पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा येथे शैक्षणिक सत्र 2021 - 22 या वर्षात पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातर्फे आयोजित या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अशोकराव पडघन गो.से. महाविद्यालय खामगाव येथील वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख, डॉ. पंकज नागपुरे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांची उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात मार्गदर्शन केले.  दीक्षांत समारंभाच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप हांडे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबतही विद्यार्थ्यांना अद्यावत आणि मूलभूत असे मार्गदर्शन केले. तसेच शैक्षणिक सत्र 2021 - 22 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान कार्यक्रम घेण्यात आला.
     या पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन आणि संचलन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुचिता दिघे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदर्शनाची जबाबदारी प्रा. अमोल निपटे यांनी पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. अलका मानकर, प्रा. डॉ. सुनंदा रेवसे, प्रा. डॉ. स्मिता तराळे, प्रा. डॉ. रवीकुमार शिंदे, प्रा. सुप्रिया गेडाम, प्रा. नीलकेश धूर्वे प्रा. डॉ. महेश मुळूक, प्रा. डॉ. सचिन मुखमाले, प्रा. सचिन जाधव, प्रा. सुनील चव्हाण, प्रा. शांताराम भोये, प्रा. डॉ. अनिता काटगाये, प्रा. डॉ. सुनिता डेकाटे यांचे मोलाचे योगदान लाभले. तर कार्यक्रमासाठी प्रा. विनोद पवार, प्रा. अतुल इंदाने, प्रा. प्रशांत बोर्डे, प्रा. शांताराम साबळे, प्रा. स्वाती कदम, एकनाथ अवचार, परेश जवंजाळ यांचेही सहकार्य लाभले.