पुरोगामी विचारवंत बहुजन चळवळीतला तारा निखळला : ॲड. विजय सावळे

पुरोगामी विचारवंत बहुजन चळवळीतला तारा निखळला : ॲड. विजय सावळे 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      महात्मा फुले,शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा वारसा सांगणा-या प्रबोधनकारी बहुजन विचारांची चळवळ तेवत ठेऊन त्यांचे विचार जगभर पेरणारा त्यांच्या विचारांचा खराखुरा समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी सतत धडपडणारा विचारवंत बहुजन चळवळीतला तारा निखळला असे मत जिल्हा व सत्र न्यायालयाचे विधीज्ञ ॲड.विजय सावळे यांनी मांडले.ते प्रा हरी नरके यांची युगप्रवर्तक समतावादी विचार मंच, बुलडाणा च्या वतीने स्थानिक हुतात्मा स्मारक वाचनालयात आयोजित अभीवादन सभेला शोक व्यक्त करतांना म्हणाले,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहिर डी आर इंगळे,समतेचे निळे वादळ संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक दाभाडे,जेष्ठ पत्रकार संजय गवई, ॲड. जयसिंगराजे देशमुख, पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे, रमेश आराख, रमेश खंडारे,प्रा शेषराव काळे, विनोद बेंडवाल, दत्ता काकस यांनी शोक सभेत प्रा हरी नरके सरांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रा सदानंद माळी यांनी मी कट्टर आरएसएस समर्थक होतो मात्र प्रा हरी नरके सरांच्या संपर्कात आलो त्यांचे साहित्य वाचले आणि मनपरिवर्तन झाले अशी ग्वाही दिली तर ॲड.प्रविण सुरडकर यांनी प्रा हरी नरके सरांचा विचार जिवंत ठेवण्या साठी त्यांच्या साहित्याचा प्रचार प्रसार व सामाजिक परिवर्तनाची लढाई आपण गतीमान करूया हिच खरी आदरांजली ठरेल असे ॲड.सुरडकर या वेळी म्हणाले. 
       या कार्यक्रमाला राहुल हिवाळे, विलास खंडेराव, विकास नांदवे,ॲड. शेषराव काळे, लक्ष्मीकांत मोहरील, ॲड.जे के देशमुख, प्रशांत सोनुने, प्रा शशिकांत जाधव, ॲड. गुणवंत नाटेकर, गौतम मोरे, संदिप गवई,डॉ बबन परमेश्वर,जयसिंग डोंगरे, रामदास दाभाडे, सुनिल जाधव, शेख बब्बु, इरफान गवळी, शाम दाभाडे, स्वप्नील हिवाळे, अविनाश खंडागळे, गौतम आराख, ॲड. अमोल गवई, ॲड. अक्षय तोत्रे, सूमित जुमडे, अंबादास तायडे, अरविंद तायडे,सुनिल पनपालिया यांनीही प्रा हरी नरके सरांना श्रध्दांजली अर्पण केली.