चिखली, मेहकर येथे मंडल दिन उत्साहात* ओबीसी अधिकारी कर्मचारी संघातर्फे गुणवंतांच्या पालकांचा सत्कार

चिखली, मेहकर येथे मंडल दिन उत्साहात
* ओबीसी अधिकारी कर्मचारी संघातर्फे गुणवंतांच्या पालकांचा सत्कार
चिखली : (एशिया मंच वृत्त)
       ओबीसी अधिकारी कर्मचारी संघातर्फे चिखली व मेहकर येथे मंडल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या उमेदवारांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. 

      चिखली येथील प्रसाद समाधान खेडेकर यांची राज्यसेवा अंतर्गत बीडीओ पदी निवड झाली. यानिमित्त त्यांचे वडील चिखली पं. स. गटशिक्षणाधिकारी समाधान खेडेकर यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष राजाभाऊ वायाळ यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष सुनील धंदर यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी रविंद्र नादरकर, कलिम पटेल, संदीप पाटील, सुभाष पवार, गणेश बाहेकर, केंद्रप्रमुख केवट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

         मेहकर येथील विद्यार्थिनी वैष्णवी रहाटे हिची एमबीबीएस वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाली. यशाबद्दल तिचे कौतुक करण्यात आले. तसेच पालक संदीप रहाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश पर्‍हाड, नंदकिशोर रहाटे, अनंथा ठाकरे उपस्थित होते.