आदिवासी मुलांच्या वसतिगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन* जागतिक आदिवासी दिवस साजरा

आदिवासी मुलांच्या वसतिगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
* जागतिक आदिवासी दिवस साजरा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आदिवासींचा इतिहास आणि स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
    श्री. सोनोने अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नंदिनी टारपे , प्रा. अविनाश गेडाम, प्रा. साखरे,  राजेश टारपे , गोपाल घेवंदे, गणेश लठाड, वसतिगृहाचे गृहपाल एस. एस. चौरपगार उपस्थित होते.
     यावेळी प्रा. अविनाश गेडाम यांनी जीवनातील संघर्षातून घडणे आणि आयुष्यात अभ्यास केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. तसेच स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन केले. गोपाल घेवंदे यांनी जागतिक आदिवासी दिवसाचा इतिहास आणि मुळ अर्थ तसेच भारतीय राज्यघटनेतील अनुसूचित जमाती बाबत तरतुदी सांगितल्या. नंदिनी टारपे  यांनी महामानवाचे विचार आत्मसात करण्याच्या सूचना करून सध्याच्या परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले,  सोनोने यांनी आदिवासी समाजाच्या प्राचीन इतिहासाची ओळख करुन दिली. राजेश टारपे  यांनी वसतिगृहातील संघर्ष, अनुभव आणि नोकरी मिळविण्यासाठी केलेली मेहनतीबाबत सांगितले.
     आनंद चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी वसतिगृहाचे डी. एन. मोरे, पी. आर. जाधव, आर. बी. इंगळे, हमीद शेख यांनी पुढाकार घेतला.