* भीमसेना संघटनेची निवेदनाव्दारे मागणी
चिखली : (एशिया मंच वृत्त)
भीमसेना संघटनेच्या वतीने कुमारी नीलिमा सुधाकर चव्हाण (24 वर्षे) रत्नागिरी जिल्ह्यातील ओमली या गावाची रहिवासी असून या मुलीवर अत्याचार करून तिचा क्रूरपणे खून केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात यावे या मागणीसाठी चिखली तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना भीमसेना संघटनेच्या वतीने 10 ऑगस्ट 2023 रोजी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, 29 जुलै 2023 रोजी कामावरून घरी परत येताना तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. ओळख न पटावी म्हणून तिच्या डोक्यावरची केस काढून चेहरा विद्रूप करण्यात आला. सदर प्रकरण हे 1 ऑगस्ट रोजी तिचा मृत्यु देह आढळून आल्याने हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेतील आरोपी ला ताबडतोब अटक करण्याची मागणी भीमसेना संघटनेचे प्रमुख भाई मनीष गवई व संघटनेचे पदाधिकारी यांनी केली आहे.
निवेदन देतेवेळी रवींद्र साळवे जिल्हा कार्याध्यक्ष, केशव खरात, राहुल पंडित, मच्छिंद्र माघाडे, सौरभ देशमुख, जितेंद्र राऊत, आनंद गवई, अनंता घेवंदे, संजय वानखडे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
