दाभा -पहूर बस सकाळीची पुन्हा सुरु करा : सरपंच डॉ. मारोती मोरे * मेहकर आगार भोंगळ कारभाराने विद्यार्थ्यांचे शेक्षणिक नुकसान

 दाभा -पहूर बस सकाळीची पुन्हा सुरु करा : 
  सरपंच डॉ. मारोती मोरे 
*  मेहकर आगार भोंगळ कारभाराने  विद्यार्थ्यांचे शेक्षणिक नुकसान 
लोणार : (एशिया मंच वृत्त)
       तालुक्यातील ग्रामीण भागासाठी मेहकर आगारातुन लोणार बस स्थानक वाहतूक नियंत्रण यांच्या नियंत्रणात बस सोडण्यात येतात परंतु गेल्या काही दिवसांपासून लोणार तालुक्यातील दाभा-पहूर मार्गावरील बऱ्याच बस फेऱ्या अनियमित केल्याने शालेय विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सोबतच जेष्ठ नागरिक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करवा लागत असल्याने दाभा पहूर मार्गावरील सकाळी 6 वाजता लोणार येथून सुटणारी बस फेरी कोविडच्या काळापासून बंद आहे.
    आता तर सर्वच सुरू असून ही सकाळी शाळेत जाण्यासाठी कोणताच पर्याय येथील विद्यार्थ्याना नाही. बरेच शाळा, कॉलेज सकाळच्या वेळेत असल्याने विद्यार्थ्यांना सकाळच्या अंधारात 5 कि. मी. पायी चालत जाऊन पुढच्या आरडव फाट्यावर एस.
 टी. बस पकडावी लागत आहे. दाभा-पहूर या गावाच्या विद्यार्थ्यांना एसटी कोणत्याच योजनचा फायदा होत नाही.
    सायंकाळी 4 वाजता सुटणारी दाभा पहूरह्या बस फेरीचा वेळ ऐवजी लोणार वरुण 5 वाजता सोडण्यात यावी, जेणे करुन दाभा-पहुर, आरडव येथील बहुसंख्य विद्यार्थी हिरडव येथे शिक्षण घेण्यासाठी जातात परंतु या विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर बस नसल्याने घर गाठण्यासाठी पायपिट करावी लागते, नाही तर शाळेच्या दोन तासिका सोडून बस पकडावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रवाशी विद्यार्थाचे त्रास टाळण्यासाठी मेहकर आगार व्यवस्थपक यांनी लोणार बस स्थानक येथून सकाळी 6 वाजता सुटणारी बस पुन्हा सुरु करण्यात यावी. व दाभा पहूर मार्गावरील बस फेऱ्या नियमित सुरू करुन एसटी बस च्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी दाभा येथील सरपंच डॉ. मारोती मोरे यांनी एका निवेदनाद्वरे मेहकर आगार व्यवस्थापक याच्याकडे केली आहे.