भरधाव अनियंत्रित एसटी बस दरीत कोसळली
* विद्यार्थ्यांसह २५ प्रवासी जखमी
चिखली : (एशिया मंच वृत्त)
भरधाव अनियंत्रित एसटी बस सवणा-चिखली मार्गावर १० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात विद्यार्थ्यांसह सुमारे २५ प्रवासी जखमी झाले असून यातील ६ जणांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, सवणा येथुन चिखलीकडे येणारी एमएच २० डी ९३६७ क्र.एसटी बस विरुद्ध दिशेने 10 फुट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये सर्व शाळकरी मुले व मुली ट्युशनसाठी चिखली जात होती. सवणा येथुन बस चिखलीकडे जात असतांना गाडीचे स्टेअरीग फ्रि झाले व ब्रेक न लागल्यामुळे गाडीवरील ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने 10 फुट दरीत कोसळल्याने गाडी मधील विद्यार्थ्यांसह 25 प्रवासी जखमी झाले असून यामध्ये प्रामुख्याने सवणा व वळती येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी ची संख्या जास्त आहे. बस मध्ये कामा निमित्ताने चिखली येथे जाणारे महीला व पुरुष ही होते.
