जखमीमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश
चिखली : (एशिया मंच वृत्त)
भरधाव अनियंत्रित एसटी बस सवणा-चिखली मार्गावर १० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आज घडली. या अपघातात विद्यार्थ्यांसह सुमारे २५ प्रवासी जखमी झाले असून यातील ६ जणांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, सवणा येथुन चिखलीकडे येणारी एमएच २० डी ९३६७ क्र.एसटी बस विरुद्ध दिशेने 10 फुट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये सर्व शाळकरी मुले व मुली ट्युशनसाठी चिखली जात होती. सवणा येथुन बस चिखलीकडे जात असतांना गाडीचे स्टेअरीग फ्रि झाले व ब्रेक न लागल्यामुळे गाडीवरील ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने 10 फुट दरीत कोसळल्याने गाडी मधील विद्यार्थ्यांसह 25 प्रवासी जखमी झाले असून यामध्ये प्रामुख्याने सवणा व वळती येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी ची संख्या जास्त आहे. बस मध्ये कामा निमित्ताने चिखली येथे जाणारे महीला व पुरुष ही होते. या अपघातात चालक रियाजुद्दीन रहीमउद्दीन - ४५, राजेंद्र चंपतराव जाधव - ५०, शारदा राजेंद्र जाधव -४२, अशोक किसन यंगड - ६०, भाग्यश्री भारत खरात - १६, युवराज सदानंद तवर - १४, रोशन सदानंद तवर -१६, पूनम भानुदास तवर - १६, दिपाली भारत शेळके - १६, पार्थ किरण करवंदे - १४, मयुर निवृत्ती भुसारी - १६, संकेत परमेश्वर भुसारी - १६, जोयेब सईद शेख - १३, वैष्णवी गजानन मूळे - १६, तनुजा दत्तात्रय करवंदे - १२, शारदा राजेंद्र जाधव, करण ज्ञानेश्वर सवडे - १५, जवेष रामेश्वर सुर्वे - १५, प्रणव राजू पवार - १५, यश रामेश्वर कार्वेद - १५, चैतन्य शिवशंकर खंडागळे - १५, गायत्री विजय भुतेकर - १६, सुहाना बी सय्यद सलीम - १५, प्रकाश दिनकर भोलाने - ७६, सुनंदा प्रकाश भोलाने - ७५, के एस पटेल - ७३, रामदास देवतम पठ्ठे - ६५, शेख अमन शेख नसीम - १६, राजेंद्र संपतराव जाधव - ५०, रोशन सदानंद तवर - १६, गायत्री संजय भुतेकर - १६, गीता गजानन गवारे - १५, स्वाती लक्ष्मण बोंबले - १५, एराब झहीर खान - १५, चैतन्य अजबराव धनवे - १४, रवींद्र समाधान धनवे १४, सुहाना प्रवीण जबीउल्ला खान - १६ हे जखमी झाले आहेत.
