सर्व समाजाच्या महिला मंडळाच्या सहकार्यामुळेच शक्य झाला महाप्रसाद : राधेश्याम चांडक

सर्व समाजाच्या महिला मंडळाच्या सहकार्यामुळेच शक्य झाला महाप्रसाद : राधेश्याम चांडक
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     सन १९९९ मध्ये सदभावना सेवा समितीची स्थापना झाली. आतापर्यत १५ कथा पुर्ण झाल्या. प्रत्येक वेळी महाप्रसाद देण्याचा विचार झाला. परंतु तुफान गर्दीमुळे हा विचार प्रत्यक्षात अंमलात आला नाही. परंतु ह्या वर्षी सदभावना सेवा समितीने आयोजीत केलेल्या शिवमहापुराण कथेमध्ये अनेक नविन महिला मंडळे जुळली. या सर्व समाजाच्या महिला मंडळांनी महाप्रसाद पंगतीत बसुन वाढायचा हे आव्हान पेलले आणि या सर्व समाजाच्या महिला मंडळाच्या सहकार्यामुळेच ह्या वर्षी महाप्रसाद शक्य झाला. असे प्रशंसनीय उदगार सदभावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी काढले.       शिवमहापुराण कथेच्या समारोपाच्या दुसऱ्या दिवशी आंतराष्ट्रीय ख्याती प्रवक्ता कथा वाचक भार्गव श्री मुनिशजी महाराज यांच्या मंत्रोच्चारात होम हवन संपन्न झाला. सर्व शिवभक्तांनी आहुती टाकल्या होम हवना नंतर अन्नदान झाले. महाप्रसादाचे उत्तम नियोजन व्यवस्थापन राजेंद्र कायस्थ कॅटर्स यांनी केले. अडीच ते तीन हजार भावीकांनी पंगतीत बसुन महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. लेवा पाटील समाज महिलामंडळ, लेवा सखी मंच, मराठा समाज महिला मंडळ यांनी विशेष सहकार्य केले. तसेच अगरवाल समाज महिला मंडळ, जयस्वाल समाज महिला मंडळ, भगवान परशुराम समाज महिला मंडळ, पंजाबी समाज महिला मंडळ, सिंधी समाज महिला मंडळ, गुरव समाज महिला मंडळ, जांगीड समाज महिला मंडळ, माहेश्वरी समाज महिला मंडळ, वर्मा समाज महिला मंडळ, गुजराथी समाज महिला मंडळ या मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी महाप्रसाद पंगतीत बसुन दिला.
चंपालाल शर्मा, सुरेश गट्टाणी, सिध्दार्थ शर्मा, नितीन जयस्वाल, उमेश मुंदडा, विजय शर्मा, प्रकाशचंद्र पाठक, लाला माधवाणी, सुरडकर, तिलोकचंद चांडक, राजेश देशलहरा, सुभाष दर्डा, बाळासाहेब गिव्हे, मधुकर गायकी, सुभाष घोरपडे, मदनलाल शर्मा, मनमोहन शर्मा इत्यादी अनेकांनी महाप्रसाद यशस्वी करण्यास योगदान दिले. विजयराज शिंदे यांचे महाप्रसादात मोलाचे सहकार्य लाभले. उत्कृष्ठ महाप्रसाद व व्यवस्थापना बद्दल सोमु कायस्थ यांचा सन्मान चिन्ह देवुन समितीने विजयराज शिंदे यांचे हस्ते सन्मान चिन्ह देवुन सत्कार केला.

* शिवमहापुराण कथेमुळे शहरात अध्यात्मिक जनजागृती :  विजयराज शिंदे

      सदभावना सेवा समिती द्वारा राजे मंगल कार्यालयात अंतरराष्ट्रीय ख्याती प्रवक्ता श्री मुनिराजी महाराज यांची शिवमहापुराण कथा आज विराम झाली. या कथेमुळे बुलडाणा शहरात अध्यात्मिक जनजागृती झाली असे प्रतिपादन माजी आमदार विजयराज शिंदे यांनी कथेचा समारोप करतांना केले.

      कथा वाचक भार्गव श्री मुनिशजी महाराज यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व मानधन देवून सदभावना सेवा समितीचे कार्याध्यक्ष चंपालाल शर्मा, सिध्दार्थ शर्मा, तिलोकचंद चांडक व इतर पदाधिकान्यांनी सत्कार केला. रामबालकदास महाराज यांचा सत्कार समितीच्यावतीने केला. यानंतर माजी आमदार विजयराज शिंदे, सौ. अर्पिता शिंदे यांच्या समितीच्या पदाधिका-यांनी शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार केला, श्री शिंदे यांच्या हस्ते आचार्य पुरुषोत्तम शास्त्री, ऑर्गन वादक सर्वचित सरगम, तबला वादक रंजित तिवारी, पॅड वादक पिल्लुजी भंडारी, अनु तिवारी, छोटे आचार्य, उमेशजी महाराज यांचा मानधन देवून सत्कार केला. या कथेच्या यशामागे पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचा निर्वाळा समितीने दिला. नंतर विजयराज शिंदे यांच्या हस्ते अग्रवाल समाज महिला मंडळ, लेवा पाटील सखी मंच, जयस्वाल समाज महिला मंडळ, भगवान परशुराम ब्राम्हण महिला मंडळ, पंजाबी समाज महिला मंडळ, गुरव समाज महिला मंडळ, जांगीड समाज महिला मंडळ, माहेश्वरी समाज महिला मंडळ, मराठा समाज महिला मंडळ, वर्मा समाज महिला मंडळ, सिंदी समाज महिला मंडळ, गुजराथी समाज महिला मंडळ यांचा स्मृती चिन्ह देवून सन्मान केला, अर्पिता शिंदे यावेळी उपस्थित होत्या. सर्व समाजाच्या महिला मंडळाने शिवमहापुराण कथेमध्ये तन मन धनाने सहकार्य केले, सद्भावना सेवा समितीचे कोषाध्यक्ष तिलोकचंद चांडक यांचा वाढदिवस भार्गव श्री मुनिशजी महाराज यांनी माल्यार्पण करुन व्यासपीठावर साजरा केला, यानंतर झाँकी सादर करण्यात आली, शिवतांडव कु. काव्या धंदर यांनी धुनमध्ये सादर केले. विठ्ठल रुख्माईच्या भुमिकेत वेदांत कानडजे, खुशी कानडजे, संत तुकारामाच्या वेशात रेवती तायडे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात राजविर खेडेकर यांनी सहभाग घेतला. राजे मंगल कार्यालय दिल्याबद्दल विजयराज शिंदे सर्व समाजाच्या महिला मंडळाचे, रुद्राभिषेक करणाऱ्या यजमानांचे, सोमु कायस्थ कॅटर्स, पोलीस प्रशासन, ज्योतीर्लिंग तयार करणारे रामप्रसाद यादव, सर्व भजनी दिंड्या, सर्व श्रोते आणि सर्व पत्रकारांनी शिवमहापुराण कथेला विस्तृत प्रसिध्द व वृत्त दिल्याबद्दल विशेष आभार मानले, सुत्रसंचालन लाला माधवाणी व आभार प्रदर्शन समितीचे सचिव प्रा. प्रकाशचंद्र पाठक यांनी केले. समाजातील सर्व स्थरातील लोकांनी, समितीच्या कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले. कथा यशस्वी झाल्याबदल राधेश्याम चांडक यांनी समाधान व्यक्त केले व आगामी २३ डिसेंबर २०२३ ला होणाऱ्या लहाने ले आऊट मध्ये देवी प्रियंकाजी यांच्या श्रीमद भागवत कथेमध्ये असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.