बुलडाणा शहरात आदिवासी क्रांतिवीरांच्या स्मारकासाठी जागा द्या...* आदिवासी क्रांतिवीरांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी : नंदिनीताई टारपे

बुलडाणा शहरात आदिवासी क्रांतिवीरांच्या स्मारकासाठी जागा द्या...
* आदिवासी क्रांतिवीरांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी :  नंदिनीताई टारपे
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       बुलडाणा शहरात मागिल वर्षा पासून विविध विकास कामे व शहराच्या सौदंर्यकरणाचे कामे तसेच सर्वच जाती धर्माच्या महापुरुषांचे स्मारक उभा करण्याचे कामे बुलडाणा विधानभेचे आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, त्याअनुषंगाने 9 ऑगस्ट 2023 जागतिक आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून बुलडाणा शहरातील व संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाची जवळ पास दोन लाख लोकसंख्या आहे असल्यामुळे, त्यामध्ये प्रामुख्याने भिल्ल, पारधी, फास पारधी, आंध, कोरकू, तडवी भिल्ल या जमाती आहेत, तसेच बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी लोकांची अनेक वर्षा पासून आदिवासी क्रांतिवीरांचे स्मारक व्हावे अशी मागणी आहे. त्या अनुषंगाने सदरील आदिवासी जमातीचे श्रद्धास्थान असलेले महापुरुष क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर तंट्या भिल्ल, व क्रांतिवीर शमशेरसिंग पारधी यांच्या स्मारकासाठी बसस्टँड आवारात, किंवा बसस्टॅण्ड समोरील प्रशासकीय इमारतीच्या आवारात किंवा जुने आरटओ ऑफिस आवारात जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आदिवासी समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनीताई टारपे यांनी नगर परिषद बुलडाणा मुख्य अधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.