आ.धिरज लिंगाडे यांची जर्मनी व इंग्लंड देशाच्या अभ्यास दौऱ्याकरीता निवड

आ.धिरज लिंगाडे यांची जर्मनी व इंग्लंड देशाच्या अभ्यास दौऱ्याकरीता निवड 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       आ.धिरज लिंगाडे यांचा महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या (भारत) जर्मनी, नेदरलँड आणि युनायटेड किंग्डमच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा अभ्यास दौरा परदेशातील विधिमंडळाच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी तसेच तेथील कारभाराची माहिती करून घेण्यासाठी आ.धिरज लिंगाडे हे जर्मनी व इंग्लंड देशाच्या दौऱ्यासाठी (दहा दिवस) रवाना झाले आहेत.
        परदेशातील शासकीय कामकाज, रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार, पगार पद्धती, निवृत्ती वेतन बाबत नियोजन तसेच सांसदीय कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्याबाबत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शासकीय नियोजन कसे असावे याबाबत हा अभ्यास दौरा आहे. या दौऱ्यामध्ये विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी विधान परिषद सदस्य प्रज्ञाताई सातव व या अभ्यास दौऱ्यामध्ये विधान सभा सदस्य व विधान परिषद सदस्य यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे उच्चवर्गीय अधिकारी यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.
      आ.धिरज लिंगाडे यांची अभ्यास दौऱ्याकरीता निवड झाल्यामुळे समाजातील सर्व स्तरामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.