बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी पुढाकार घेतला असून विविध प्रश्न शासन दरबारी रेटत आंदोलनात्मक भूमिका घेतली. त्यामुळे बेरोजगार युवक वंचित बहुजन युवा आघाडीत संघटीत होत आहेत. दरम्यान वंचित बहुजन युवा आघाडीच्या सदस्य नोंदणी अभियानाला २२ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात करण्यात आली. सभासद नोंदणीला युवकांचा मोठा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन युवा आघाडीच्या चिखली रोडवरील हाजी मलंग दर्ग्याजवळील जनसंपर्क कार्यालयापासून युवा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ झाला. वंचित बहुजन युवा युवा आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वंचितची ताकद वाढवण्यासाठी सभासद नोंदणीवर जोर दिला आहे. शहरात या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सतीश पवार यांनी सांगितले. येत्या २८ ऑगस्टपासून तालुकानिहाय सदस्य नोंदणी अभियान राबवले जाईल, असेही सतीश पवार यांनी सांगितले.
