* जिल्हा कॉग्रेस मुख्यालयात स्वातंत्रदीन उत्साहात साजरा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
देशाला ब्रिटीशांच्या गुलागिरीतुन मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, अनेकांनी त्याग केला, बलीदान दिले, मोठया संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र मिळाले आहे. पणं ज्या लोकांचा स्वातंत्र लढयात सहभाग नव्हता तेच लोक आज सत्तेवर आहेत. या मनुवादी विचार धारेचे दररोज संविधानाची हत्या करत आहे. आपला राष्ट्रध्वज तिरंगा मानाने डौवलत ठेवायचा असुन संविधान व लोकशाही अबाधीत ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा असे आवाहन जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले.
जिल्हा कॉग्रेस मुख्यालय, गांधी भवन बुलडाणा येथे स्वातंत्रदिन उत्साहत साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष बोंद्रे यांनी ध्वजारोहन करून सर्वांना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना म्हणाले की, देशाचा स्वातंत्रदीन साजरा होत असतांना पुर्व संध्येला काही लोकांनी काळा दिवस पाळला. या लोकांची विचारधारा पाहा, या लोकांचे स्वातंत्र चळवळीत काहीही योगदान नसतांना खोटे बोलुन सत्तेत आले व मागिल 9 वर्षापासुन देशाची संपत्ती विकुन देश चालवित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सर्वसामान्य जनतेला समाजाच्या मुख्यय प्रवाहात आनण्याचे काम केले. या संविधानाचा रोज खुण केला जात आहे. भय, भ्रष्टाचारातुन सत्ता, स्थापन कराचयी हेेच काम सुरू आहे. ब्रिटीश राजवटीत शेतक-यांबद्दल जी भाषा वापरली जात असे आज तिच भाषा वापरली जात आहे. जनतेला पुन्हा गुलामगिरीत ढकल्याचे काम सुुरू आहे. बलाढय शक्तीशाली अत्याचारी ब्रिटीशांना कॉग्रेसने देशातुन हाकलुन लावले आज पुन्हा एकदा तिच परिस्थती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेने सावध राहावे, सजग राहावे असे त्यांनी सांगितले. यावेळी अभाकॉकचे सचिव माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश उपाध्यक्ष विजय आंभोरे, प्रदेश सचिव अॅड.जयश्रीताई शेळके, चित्रागन खंडारे, डॉ. गार्गी सपकाळ, दिलीपराव जाधव, प्रा. संतोष आंबेकर, दिपक रिंढे, चॉंद मुजावर, राजु सोनुने, सतिष मेहेंद्रे, सुनिल सपकाळ, दिपक खरात, गणेश पाटील, प्रतिलाताई गवई, महिला कॉग्रेस शहर अध्यक्षा इंदुताई घट्टे, बानोबी चौधरी, ज्योत्सना जाधव, सैयद इरफान, शैलेश खेडकर, अॅड.विजय बोथरा, जाकीर कुरेशी , सुनिल तायडे, दत्ता काकस, प्रतिक जाधव, अॅड. प्रविण सुरडकर, रखमाजी महाराज, सुनिल मोरे, विनोद बेंडवाल, रवि भाकरे, सैसद अमीन, सुरेश सरकटे, एकनाथ चव्हाण, मोईन काझी, गौतम मोरे, शेख मुजाहीद, गुडूु मिर्झाआदींची उपस्थिती होती.
