क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलडाणा यांचे संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी सभागृह नांदुरा येथे जिल्हास्तरीय शिकई मार्शल आर्ट स्पर्धा नुकत्याच आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये महात्मा फुले शाळा बुलडाणा विदयार्थी चेतन दराखे, रोहित शर्मा, सार्थक वानेरे, लावण्या जाधव, प्रज्ञा निकाळजे यांनी प्रथम क्रमांक मिळवुन विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
अनुराधा बावस्कर, प्रांजल सुरडकर, प्रतिक हुडेकर, ओम पवार यांनी द्वितीय क्रमाक पटकावला आहे. या विदयाथ्यांना शिकई मार्शल आर्टचे जिल्हा प्रशिक्षक अरविंद अंबुसरक यांचे मार्गदर्शन लाभले. विदयार्थी आपले यशाचे श्रेय मुख्याध्यापिका स्नेहलता मानकर, पर्यवेक्ष नरेश पेद्ये, शिक्षकवृंद व पालकांना देतात. यशस्वी विदयाथ्यांचे महात्मा जोतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकश वानेरे, सचिव इंजि.सुरेश चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, धारपवार, मनोज श्रीवास, बाळकृष्ण महानकर यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
