महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद येथील नियमबाह्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा* शेख जहीर यांची अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद येथील नियमबाह्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा
* शेख जहीर यांची अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      वक्फ बोर्ड औरंगाबाद यांच्याकडे हजरत मोहम्मद हनिफ मस्तान रहमान सैलानी मौजे अनसिंग ता. वाशिम जिल्हा वाशिम ही वक्फ बोर्ड औरंगाबाद येथे पंजीकृत संस्था आहे. या संस्थेने योजना मिळावी यासाठी औरंगाबाद वक्फ बोर्ड यांच्याकडे रीतसर फाईल जमा केली. परंतु या वक्फ बोर्ड मधील मुजोर कर्मचाऱ्यांनी या संस्थेला या योजनेपासून साफ दुर्लक्ष केले. या मुजोर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे यासाठी शेख जहीर यांनी अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 9 ऑगस्ट 2023 रोजी केली.

दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शेख जहीर शेख खलील (अध्यक्ष) व शब्बीर हुसेन मोहम्मद (सचिव) R.N.MSBW/WSM/108/2017 दि. 28.01.2020 रोजी वक्फ बोर्ड औरंगाबाद यांच्याकडे आवक क्र.637 नुसार सादर केलेली योजना असतांनाही त्यांनी या योजनेची हेतुपुरस्सर कोणतीही दखल न घेता इतर जिल्हयातील व परराज्यातील व्यक्तीच्या सादर केलेल्या योजनेची दखल घेवून परस्पर दि.07.02.2022 रोजी जाहीर केला. 

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख व लिपीक आसिफ मुत्तवली यांनी राष्ट्रीय दुखवटयाच्या दिवशी दि.07.02.2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधनामुळे राज्य शासनाची सुट्टी असूनही सर्व नियम धाब्यावर बसून हा निर्णय घेवुन आमच्यावर अन्याय केलेला आहे. तसेच शेख अनिस तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वक्फ बोर्ड औरंगाबाद व लिपीक आसिफ मुत्तवली यामध्ये आर्थिक व्यवहार केले आहे या बाबीची सखोल चौकशी करुन यांचेवर कार्यवाही करावी व आमचा दि. 28.01.2023 रोजी सादर केलेली योजना स्विकारुन व्यवस्थापनाची संधी उपलब्ध करुन न्याय दयावा.

     सदरील प्रकरण हे हजरत मोहम्मद मस्तान रहेमान सैलानी सरकार ता. जि. वाशिम दर्गा व्यवस्थापन योजना समिती चे असून मुख्य कार्यकारी अधिकारी वक्फ बोर्ड औरंगाबाद यांनी दिलेला निर्णय पुर्णतः चुकीचा आहे. सदरील निर्णयामध्ये पान क्र. 4 वर निष्कर्ष मध्ये शब्बीर हुसेन मुहम्मद हुसेन यांना हरकतदार दाखवुन श्री. शेख जहीर शेख खलील (अध्यक्ष) व शब्बीर हुसेन मुहम्मद हुसेन (सचिव) यांनी सादर केलेली योजना क्रमांक MSBW/WSM/108/2017 दि.28 जाने 2020 वक्फ बोर्ड औरंगाबाद यांचेकडे आवक जावाक विभागामध्ये योजना सादर करण्याचे दि.28.01.2022 पावती क्र. 28891 रु.3500 शुल्क पावती असूनही अनिस शेख मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आमची कोणतीही योजना सादर नाही, असा चुकीचा निर्णय निष्कर्ष देवुन, व्यवस्थापनाचे अधिकारी लाचखोरी करून मोहम्मद अशफाक मोहम्मद जुसैद या वाशिम जिल्हयाबाहेरील तसेच हजरत मोहम्मद हनिफ मस्तान रहमान सैलानी दर्गा अनसिंग सोबत कोणताही संबंध नसतांनाही या अपात्र व्यक्तीच्या योजनेच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. हे सर्व नियम बाह्य आहे, तरी या कर्मचाऱ्यावर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा असेही निवेदनात नमूद आहे. निवेदनावर शेख जहीर, शब्बीर हुसेन यांच्या सह्या आहेत.

28.01.2020 रोजीची शिफारस पत्र अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री बुलडाणा बुलडाणा आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले चिखली विधानसभा, आमदार आकाश पांडुरंग फुंडकर खामगाव, आमदार राजेश पंडीतराव एकडे मलकापूर , आमदार धनंजय मुंडे, डॉ. फौजीया खान राज्यसभा सदस्य, भारत सरकार तथा वक्फ बोर्ड सदस्य भारत सरकार यांचे शिफारस पत्र, स्मरणपत्र व पेपर चे कात्रणे यासर्व मान्यवरांच्या पत्रांना काहीच महत्व दिले नाही. या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख वक्फ बोर्ड औरंगाबाद व लिपीक आसिफ मुत्तवली कायदयाची पायमल्ली करुन आमच्यावर अन्याय केला आहे, तरी यांच्यावर कठोर कारवाई करावी असेही निवेदनात नमूद आहे.