हर घर तिरंगा’ या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा * बुलडाणा नगर परिषद प्रशासनाचे आवाहन

हर घर तिरंगा’ या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा 
* बुलडाणा नगर परिषद  प्रशासनाचे आवाहन 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश”(मिट्टी को नमन, वीरो को वंदन) हे
अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरापर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरत निर्माण व्हावी व मातृ भूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा याकरिता सदर अभियान राबविण्यात येत आहे.
     सदर अभियानाचा एक भाग म्हणून ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात दिनांक १३ ऑगस्ट ते १५
ऑगस्ट दरम्यान शहरातील नागरिकांनी आपल्या घरावरती राष्ट्रध्वज लावून आपला सहभाग नोंदवावा असे नगर परिषद प्रशासना मार्फत आवाहन करण्यात येते. तसेच नागरिकासाठी राष्ट्रध्वज विक्रीकरिता नगर परिषद कार्यालय, बुलडाणा येथे  १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान ठेवण्यात आला आहे.