मुस्लिम शाह फकीर समाजाचा आता आझाद मैदानावर एल्गार * 29 ऑगस्ट ला शेकडो समाज बांधव मुबंई त एकवटणार

मुस्लिम शाह फकीर समाजाचा आता आझाद मैदानावर एल्गार 
* 29 ऑगस्ट ला शेकडो समाज बांधव मुबंई त एकवटणार
मुंबई : (एशिया मंच वृत्त)
      राज्यातील मुस्लिम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करण्यात यावा या मागणी करिता मुस्लिम शाह फकीर समाज संघटना महाराष्ट्र च्या वतीने आता आझाद मैदान मुबंई येथे एल्गार पुकारण्यात आला असुन 29 ऑगस्ट 2023 रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुस्लिम शाह फकीर समाज संघटने संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह यांनी  शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री सचिवालय मुबंई यांना एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे
             संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, राज्यातील मुस्लीम शाह फ़कीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने अग्रक्रमाने करावा, या महत्वपूर्ण मागणी बाबत राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर मोठया प्रमाणात आंदोलने करण्यात येत आहे. परंतू राज्यातील शासनाने त्याची अद्यापही कोणतीही दखल न घेतल्यामुळे राज्यात मुस्लीम शाह फकीर समाजामध्ये प्रचंड रोष आहे. या प्रमुख मागणी करीता आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी हजारो समाज बांधवा समवेत एक दिवशीय धरणे आंदोलन प्रचंड संख्येने करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या अंती देण्यात आला आहे.
        निवेदनावर संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह यांची स्वाक्षरी आहे. सदरच्या आंदोलनात राज्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष लुकमान शाह, महासचिव जाकीर शाह, विदर्भ अध्यक्ष मुश्ताक शाह, विदर्भ कार्याध्यक्ष सरदार शाह, विदर्भ उपाध्यक्ष अय्युब शाह, युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष अकिल शाह, बुलडाणा जिल्हा अध्यक्ष तहेसिन शाह, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सईद शाह यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.