बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड एक महिन्यासाठी प्रशिक्षणाला गेल्यामुळे जिल्हाधिकारी पदाचा पदभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आयएएस अधिकाऱ्यांसाठी घेतला जाणारा मिड करिअर फेज ४ च्या प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांची निवड झाली होती. त्यामुळे एक महिन्यासाठी ते मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे ८ मे २०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी हा पदभार स्वीकारला आहे.
