बुलडाण्यातील खवय्यांसाठी रत्नागिरीचा हापूस आंबा शहरात दाखल * बुलडाणा अर्बनचा 17 वर्षाचा स्तुत्य उपक्रम

बुलडाण्यातील खवय्यांसाठी रत्नागिरीचा हापूस आंबा शहरात दाखल 
* बुलडाणा अर्बनचा 17 वर्षाचा स्तुत्य उपक्रम 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      विदर्भातील नागरिकांना कोकणी आंबा केव्हा चाखायला मिळेल, हे एक स्वप्नच होत.. मात्र बुलडाणा  अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षानी एक निर्णय घेऊन थेट रत्नागिरी येथून हापूस आंबा आणण्याचा निर्णय घेत, ट्रक भरून हापूस आंबा आणल्या गेलाय ... बुलढाणेकरांना हापूस आंबा चाखाता यावा या हेतूने पतसंस्थेच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम राबवीला जात आहे ... हा रत्नागिरीचा हापूस आंबा जिल्ह्यातील सर्व तालुके शहरापर्यंत पोहोचविण्याचं काम बुलढाणा अर्बन करित आहे... ना नफा, ना तोटा या तत्वावर बुलढाणा अर्बनने रत्नागिरीचा हापूस आंबा विक्रीला आणला आहे.
    8 मे रोजी बुलडाणा अर्बन मुख्यालया समोर हापूस आंब्याच्या स्टॉलचे उदघाटन डॉ सुकेश झवर यांच्याहस्ते करण्यात आले. कंझुमर स्टोअर्सचे व्यवस्थापक संजय कस्तुरे, लिपिक सतीश उबाळे व पंकज सपकाल हापूस आंबा स्टॉलचे कामकाज पाहत आहेत. यावेळी पहिले ग्राहक अॅड विजय बोथरा, पराग पाटील, सुभाष उबरहंडे, स्वप्नील मयुरे, मोहन आढाव, निलेश नारखेडे यांना हापूस आंब्याच्या पेटीचे वाटप करण्यात आले.
         संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झवर यांनी जिल्हावासियांची मागणी ओळखून हा आंबा गेल्या 17 वर्षापासून बुलढाणा शहर व जिल्ह्यात आणला आहे. यावर्षी राज्यात प्रचंड गारपीट व अवकाळी पाऊस झालाय याचा फटका कोकणातील आंब्याना सुद्धा बसला आहे त्यामुळे हापूस आंबा मिळणे कठीण होऊन बसले होते तरीही बुलढाणा अर्बनने प्रयत्न करून सुरवातीला 300 पेट्या हापूस आंबा आणून बुलढाणेकरांची आंब्याची भूक भागविली आहे, हे विशेष.