स्त्री रोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्त्री रोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 
मोताळा : (एशिया मंच वृत्त)
       राजर्षी शाहू मल्टिस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी आणि परीस बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ५ मे २०२३ रोजी आयोजित मोफत स्त्री रोग व गरोदर माता आणि वंध्यत्व तपासणी मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. 
       येथील नांदुरा मार्गावरील राजर्षी शाहू पतसंस्थेच्या सभागृहात शुक्रवारी ५ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उदघाटन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. रवींद्र महाजन, डॉ. विनोद जवरे, गजानन बोदडे, काशिनाथ बिचकुले, अमोल देशमुख, श्रीकृष्ण पाटील, सुरेश सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्त्री रोग तज्ञ टेस्ट ट्यूब स्पेशालिस्ट डॉ. अश्विनी देशमुख आणी प्रसूती तज्ञ व स्त्री रोग चिकित्सक डॉ. माधवी जवरे यांनी रुग्णांची तपासणी केली. रुग्णांच्या समस्या जाणून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच औषधोपचार केले. 
     यावेळी बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले की, कुटुंबातील महिलेवर घराची संपूर्ण जबाबदारी असते. कुटुंबात कोणाला काय हवे, काय नको हे महिला बघतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे त्यांना लक्ष देण्यास वेळ मिळत नाहीत. महिलांनी आधी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणजे त्यांना संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देता येईल. जवळपास शंभरावर महिलांनी आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निखिल शिंबरे, दीपक शेजोळ, नीलेश व्यवहारे यांच्यासह संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.