* नागरिकांनी लाभ घेण्याचे भारतीय स्तूप व लेणी समितीचे आवाहन
संग्रामपूर : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यात भोन येथे उत्खननात सापडलेल्या २३०० वर्ष जुन्या बुद्ध स्तूप स्थळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुद्ध जयंती निमित्त ५ मे 2023 रोजी भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समिती कडून बुद्ध वंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासोबतच यावर्षी या बुद्ध स्तूप स्थळाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना येथे उत्खननात सापडलेल्या २३०० वर्ष जुन्या बुद्ध स्तूपाच्या पोस्टर प्रदर्शनीच्या माध्यमातून प्राचीन भारतातील बौद्ध संस्कृतीचा इतिहास जाणून घेता येणार आहे. त्यासोबतच येथे बुद्ध भीम गीतांचा गायक कुणाल वाकोडे (T-Series फेम) यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यावेळी जाहीर व्याख्यान देखील होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात प्राचीन भारताचा इतिहास सांगणारा भला मोठा बौद्ध स्तूप सण २००२ साली डेक्कन कॉलेज पुणे येथील प्रा. डॉ. भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वात झालेल्या संशोधनादरम्यान उत्खननात भोन येथे भला मोठा बौद्ध संस्कृतीचा इतिहास सांगणारा ऐतिहासिक ठेवा आढळून आला आहे. भोन येथील बौद्ध स्तूप आणि ऐतिहासिक वास्तू सण २३०० वर्ष जुन्या असल्याचं डॉ. देवतारे यांनी केलेल्या संशोधनात सिद्ध झाल आहे. त्यामुळे प्राचीन काळी विदर्भाच्या पूर्णा नदीच्या तीरी एक भलं मोठं बौद्ध धम्म संस्कार केंद्र असल्याचं अनेकांकडून सांगितलं जातंय. सम्राट अशोकाने बांधलेल्या ८४ हजार स्तुपा पैकी एक भोन येथील स्तूप असू शकते. त्यासाठी या स्तूपाच्या संवर्धनाचे आणि संगोपनाचे काम जलसंपदा विभाग आणि भारतीय पुरातत्व खाते यांच्या प्रशासकीय प्रक्रियेतून लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात जिगाव प्रकल्पाच्या बॅक वॉटर च्या पाण्याच्या मधोमध तब्बल साडेतीनशे एकरामध्ये लवकरच उत्खनन होणार आहे. ज्या माध्यमातून तब्बल २३०० वर्ष जुना भारतीय संस्कृतीचा इतिहास पुन्हा एकदा जगासमोर येणार आहे. आणि याच भोन येथील स्तूप स्थळी यंदाच्या बुद्ध जयंतीला भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीकडून बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेतल्या जात आहे. त्यामुळे या ऐतिहासिक आणि बौद्ध धम्मासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या बौद्ध स्तूप स्थळाला बुद्ध जयंती निमित्त वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येत परिसरातील नागरिकांनी यावं असे आवाहन भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ मेश्राम यांच्याकडून करण्यात आले आहे.
