* स्पर्धेतील रॅम्प वॉकने सर्वांनाच घातली भुरळ; फॅशन आयकॉन्स पुरस्कारही पटकाविला
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्ह्यातील संतनगरीस्थित एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व संबंधीत क्षेत्राचा गंधही नसतांना, प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर शेगाव च्या गायत्री रोहणकार हीने राजधानी दिल्लीत झालेल्या एका स्पर्धेत उत्कृष्ट व दिलखेचक रॅम्प वॉक सादर करुन अनेकांच्या काळाजाचा ठोका चुकवित त्यांना भुरळ घातली. सोबतच फॅशन आयकॉन्स पुरस्कार पटकावित देशात शेगावच नाही तर बुलडाणा जिल्ह्याचा नावलौकीक वाढविला.
लवी स्टाईल प्रोडक्शनचे संस्थापक डॉ. विजय विराज, संचालीका लवी राज, संस्थापक आणि संचालक यांनी नुकतीच राजधानी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील शायनिंग स्टार इंडिया अवॉर्ड्सच्या ५ वी आणि लवी स्टाईल मिस्टर, मिस आणि मिसेसच्या ४ थी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत देशातील विविध राज्यातील फॅशन मॉडल स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी लोकप्रिय विरांगणा महाराष्ट्राची तथा मिस पॉप्यूलरचा किताब मिळविलेल्या शेगाव येथील गायत्री वासुदेव रोहणकर हीला प्रमुख पाहूणी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या ठिकाणी गायत्रीने सादर केलेल्या रॅम्प वॉकने अनेकांची मने जिंकली. नव्हे तर देशभरातून आलेल्या शेकडो फॅशन मॉडल्स्मधून गायत्री स्पर्धेची प्रमुख आकर्षण ठरली. आकर्षक ठरलेल्या तिच्या रॅम्प वॉकने स्पर्धक आणि मान्यवरांना चांगलीच भुरळ घातली, हे विशेष!
शेगाव येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या गायत्री रोहणकर हीने प्राथमिक शिक्षण अकोला येथे घेतले. तर पद्वीचे शिक्षण खामगाव येथे पूर्ण केले. फॅशनचा कोणताही गंध व मार्गदर्शन नसतांना गायत्रीने अल्पावधीतच स्वत:च्या हिंमत व बळावर या क्षेत्रात आपल्या नावाचीच नव्हे तर जिल्ह्याची छाप उमटवली. सोबतच तीला नुकताच वसुंधरा गाझियाबाद (दिल्ली) च्या रॉयल पॅलेसमध्ये स्टायलिश फॅशन आयकॉन्स पुरस्कार-२०२३ ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे संतनगरी शेगावसह बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
क्षमतेवर विश्वास ठेवल्यास यश तुमचेच
स्पर्धा कोणतीही असो, त्यामध्ये चमकण्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागेल. कठोर परिश्रम करत राहा, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि नेहमी स्वत:ची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करा. स्वत:वर आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून वटचाल केल्यास यश तुमच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रीया गायत्री रोहणकार हीने प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.
* जिल्ह्याच्या शिरपेचात सात पुरस्कार :
दरम्यान, २०२१ मध्ये गायत्रीने मिस पॉप्युलर, २०२२ मध्ये विरांगना विदर्भाची, मिस महाराष्ट्र (लोकप्रिय विरांगना महाराष्ट्राची), स्पेशल वॉल्क मॉडेल-२०२२, विनिंग शायनिंग स्टार इंडीया-२०२२, मिस इंटरनॅशनल विनर-२०२२ व नुकताच टॉप १०० स्टाईलीश फॅशन आयकॉन ऑफ इंडीया-२०२३ हा पुरस्कार पटकाविला, हे विशेष!
