बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शहरी व ग्रामिण भागात रहिवासी प्रयोजनासाठी वापरात असलेल्या शासकीय जमीनीचे भुखंड कायम करून देण्यात यावे, आर्थीकदृष्ट्या मागासलेल्या लाभार्थी कुटूंबाला कायमस्वरुपी व पक्के घर बांधुन देण्यात यावे, शहरी व ग्रामिण भागातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, यासह इतर मागण्यासाठी वंचीत बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात नुकतेच येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
दिलेल्या निवेदनानुसार आजही शहरी व ग्रामिण भागातील गोरगरीब लाभार्थी जागे अभावी घरकुलापासून वंचीत आहेत. आर्थीक परिस्थीती नसल्यामुळे ते घरे बांधु शकत नाहीत. त्यातच मागील काही वर्षापासुन भरमसाठ बेरोजगारी वाढली आहे. हाताला काम नसल्यामुळे युवक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल देवून युवकांना रोजगार सुरू करण्यासाठी भुखंड उपलब्ध करून देण्यात यावा, बेरोजगार युवकांना तातडीने कर्ज पुरवठा करण्यात यावा, बेरोजगाराची कर्ज प्रकरणे प्रलंबीत ठेवणार्या बॅंक अधिकारी व कर्मचार्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात सतिष पवार, बाला राऊत, अर्जुन खरात, गुलाबराव गवई, प्रेम तोंडीलायता, सतिष मोरे, अमर इंगळे, गजानन वाघ, राहुल जाधव, सनी खरात, महेद्र जाधव, सुनिल चव्हाण, विशाल जंगम, अनिल पारवे यांच्यासह असंख्य वंचीतचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
