साखरखेर्डा येथे गवंडी कामगाराचा गळा दाबून खून* आरोपी गजाआड

साखरखेर्डा येथे गवंडी कामगाराचा गळा दाबून खून
* आरोपी गजाआड 
साखरखेर्डा : (एशिया मंच वृत्त)
          येथील वार्ड क्र 6 मध्ये क्षुल्लक कारणावरून जाफ्राबाद मोहल्ल्यातील एका युवकाचा गळा दाबून खून केल्याची घटना 14 एप्रिल 2023 च्या सकाळी उघडकीस आली दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
      पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहिती अनुसार 13 एप्रिलच्या रात्री झोपडपट्टी भागात  शे. अदिल शे अकिल वय 17 व प्रशांत योगेंद्र गवई रा. सावंगी भगत या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान भांडणात होऊन प्रशांत याने शे. अदिल याचा गळा आवळला दरम्यान अदिल हा जागेवर बेशुद्ध पडला असता त्याला प्रथम साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर चिखली येथे हलविण्यात आले मात्र मध्येच त्याची प्राणज्योत मालवली. या भागात ताडी मोठ्या प्रमाणात विकल्या जात असून येथे अनेक मृत्यू यापुर्वी झाले आहे दरम्यान हा प्रकार जुगारात घडल्याची चर्चा असून सबंधित यंत्रणा याकडे डोळेझाक करून वरकमाईत मग्न आहे. अजून किती बळी जाणार? असा प्रश्न सुजान नागरिकाला पडला आहे. दरम्यान रात्री उशिरा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली.  आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार गजानन मुंढे, पो. हे. कॉ. निवृत्ती पोफळे, अनिल वाघ, प्रदीप सोभागे, लक्ष्मण ईनामे हे करीत आहेत.