बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
समस्त समाज बांधवाना कळविण्यात येते की ,संवेदना प्रतिष्ठान, बुलडाणा या सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने २३ एप्रिल २०२३ रोजी गांधी भवन जयस्तंभ चौक बुलडाणा येथे सकाळी ९ ते सायं .५ वाजेपर्यंत भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वच समाजात सध्या लग्न - विवाह न जमणे, झालेले विवाह न टिकणे ,सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढणे शैक्षणिक कारणामुळे व नोकऱ्या शोधण्यात वय निघून जाणे यासारख्या ज्वलंत समस्यांनी समाज चिंतित आहे. उपवर, घटस्फोटित, विधुर मुलामुलींचे प्रश्न अधिक बिकट होत आहेत यासाठी अल्पसा प्रयत्न म्हणून संवेदना प्रतिष्ठान मार्फत मोफत बौद्ध वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. यापूर्वीही दोन वेळा अश्याच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमास मिळाला होता हा कार्यक्रम खास करून इच्छुक वधू वरांसाठी आहे तरी मोठ्या संख्यने उपवर, वधू-वर ,घटस्फोटित वधु-वर विधुर वर यांनी समक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत.
