*ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाने महोत्सवाचा समारोप
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
येथील बुलढाणा अर्बन परिवाराचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचे वडील स्वर्गीय देवकिसनदासजी चांडक यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. 23 ते 25 एप्रिल दरम्यान तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डोंगर खंडाळ्यातील सहकार विद्या मंदिर परिसरात सायंकाळी हा किर्तन महोत्सव संपन्न होणार आहे.
बुलडाणा अर्बन परिवाराचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचे वडील स्वर्गीय देवकिसनदासजी चांडक यांचे पुण्यतिथी दरवर्षी डोंगरखंडाळा परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली जाते. यंदा बुलडाणा अर्बन परिवाराच्या वतीने तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दि. 23 एप्रिल रोजी प्रसिद्ध किर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन होणार आहे. 24 एप्रिल रोजी हभप राजुदास महाराज यांचे बंजारा भाषेतून कीर्तन होणार आहे. 25 एप्रिल रोजी या कीर्तन महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने केले जाणार आहे.
या कीर्तन महोत्सवाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
