स्विफ्ट डिझायर दुचाकीचा दर्यापूर जवळ अपघात* अपघातात तीन जण ठार * बुलढाण्यातील दोघांचा समावेश

 स्विफ्ट डिझायर दुचाकीचा  दर्यापूर जवळ अपघात
* अपघातात तीन जण ठार * बुलढाण्यातील दोघांचा समावेश
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
         बुलढाण्यातील आपल्या मित्राच्या लग्नासाठी अमरावती येथे जात असलेल्या  स्विफ्ट डिझायरला दर्यापूर जवळ  झालेल्या अपघातात स्विफ्ट डिझायर मधील दोन जागीच ठार झाले असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
            मिळालेल्या माहितीनुसार बुलढाण्यातील पवन देशमुख यांचे 13 एप्रिल 2023 रोजी  संध्याकाळी अमरावती येथे लग्न होते. या लग्नासाठी त्यांचे वर्गमित्र स्विफ्ट डिझायर गाडीने अमरावती कडे जात असताना काळाने घात करत  अकोल्याच्या पुढे दर्यापूर जवळ मोटार सायकल आणि स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये जोरदार धडक  झाली. झालेल्या धडकेत बाईकस्वार जागीच ठार झाला तर स्विफ्ट डिझायरने चार-पाच पलट्या खाल्ल्याने या भीषण अपघातात स्विफ्ट डिझायर मधील हे दोन जण जागीच ठार झाले  तर  दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना अकोला येथे उपचारासाठी भरती केले. 
       मृतकांमध्ये बुलढाण्यातील प्रफुल्ल गावंडे (वय 27),  प्रतीक राऊत (वय 25) यांचा समावेश आहे. तर स्विफ्ट गाडीला धडकणाऱ्या लासुरा येथील बाईक स्वराचे नाव सचिन रामकृष्ण दुधंडे आहे.