बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबाराव फुले यांची १९६ वी जयंती व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती बहुजन हिताय बहुजन सुखाय, प्रवाशाच्या सेवेसाठी हे ब्रीद समोर ठेवून बुलडाणा आगारातील व विभागीय कार्यालयातील राज्य परिवहन कर्मचारी बांधव दरवर्षी प्रमाणे म्हणजे १९८८ पासून मोठ मोठे विचारवंत, साहित्यिक, प्रशासनातील आधिकारी, राजकारणातील आमदार खासदार समाजीतील प्रतिष्ठीत व्यक्तींना आमंत्रण करून डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे विचार व सामाजीक प्रबोधनाचे विचार सामान्य जनतेला देण्यासाठी हा उपक्रम राप कर्मचारी एकमताने एकविचाराने करित आहे. यावर्षी सुध्दा बुलडाणा या एसटीच्या ब्रीद समोर ठेवून एसटी कर्मचाऱ्यांनी प्रबोधनात्मक विचारवंत अमर बोरकर सर यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम १४ एप्रील २०२३ रोज शुक्रवारला सकाळी ९.०० वाजता बुलडाणा बसस्थानकावर आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोककुमार वाडीभस्मे विभागनियंत्रक बुलडाणा , हे राहणार आहे. प्रमुख उपस्थीतीत अमोल गाडबैल यंत्रअभियंता, अमृत कच्छवे विभा.वाहतूक अधिकारी, स्वप्निल मास्कर उपयंत्र अभियंता, अजय नाईक बांधकाम अभियंता, जयंत कांडलकर सुरक्षा व दक्षता अधिकारी, राहूल तांबडे डिपीओ, संतोष वानेरे आगार व्यवस्थापक, दिपक साळवे स्थानक प्रमुख, प्रदिप पाचपवार भांडार अधिकारी, पद्दमाकर मगर वाहतूक निरिक्षक तर विशेष उपस्थीती मध्ये राजेंद्र काळे राज्य उपाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद तथा जिल्हा प्रतिनिधी दैनिक देशोन्नती, दैनिक विश्व विजेताचे मुख्यसंपादक तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, दैनिक वृत्तरत्न सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब जाधव, वरिष्ठ पत्रकार सिध्दार्थ आराख, दैनिक पुन्यनगरीचे उपसंपादक सचिन लहाणे, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष सुभाष खरे हे राहणार आहे तर या प्रबोधन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गुडईव्हनिंग सीटीचे मुख्य संपादक, निवेदक, लेखक, कवी, साहीत्यीक पत्रकार
रणजितसिंग राजपूत हे करणार आहे तरी या प्रबोनाच्या कार्यक्रमासाठी प्रवासी वर्गाने व बुलडाणा शहरातील नागरीकानी तसेच राज्यपरिवहन कर्मचारी वर्गानी जास्तीत जास्त संखेने उपस्थीत राहावे असे आवाहान एसटी कर्मचारी बुलडाणा आगार यांनी केले आहे .
