* एकूण चार शिक्षक गजाआड
सिं. राजा : (एशिया मंच वृत्त)
बारावीच्या गणित पेपर फुटीप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आणखी दोन शिक्षकांना अटक केली. ६ मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी आरोपी शिक्षकांना १० मार्च २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ मार्च २०२३ च्या रात्री १०.३० वाजता शेख शकील शेख मुनाफ (लोणार ) अंकुश पृथ्वीराज चव्हाण ( सावरगाव- तेली, ता. लोणार ) यांना अटक केली. या दोघांना सोमवारी देऊळगाव राजा न्यायालयात हजर करण्यात आले.
दोन्ही आरोपींना १० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हे दोघे आरोपी खासगी शिक्षण संस्थेवरील शिक्षक आहेत. पेपर फूट घोटाळ्यामध्ये आतापर्यंत चार शिक्षकांना अटक करण्यात आली असून, एकूण आरोपींची संख्या सात झाली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.