दिल्ली येथे राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी ब्रम्हमित्र पुरस्काराने सन्मानित

दिल्ली येथे राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी ब्रम्हमित्र पुरस्काराने सन्मानित 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      बुलडाणा अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटीचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी यांना अखील भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने दिला जाणारा ब्रह्ममित्र पुरस्कार महासंघाच्या वतीने नुकतेच  चांडक यांना प्रदान करण्यात आला.
        अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्यावतीने नवी दिल्ली येथे राष्ट्रीयस्तरावर काम करणारे उद्योगपती, वैद्यकिय व विधी क्षेत्रातील मान्यवर यांचे द्विवार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हे अधिवेशन दिनांक २५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत नविदिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात राष्ट्रीय व सामाजिक योगदानाबद्दल ब्रह्ममित्र पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीचा हा एकमेव पुरस्कार अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष  गोविंदजी कुळकर्णी यांनी बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे सर्वेसर्वो  राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांना जाहीर केला होता.        राधेश्यामजी चांडक यांनी बँकिंगसोबतच गेल्या ३६ वर्षांच्या अथक प्रयत्नातून हजारो हातांना काम आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून दिलेल्या असाधारण सामाजिक योगदानाबद्दल ' ब्रम्हमित्र ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खा.अरविंद शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून हा दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ५.०० वाजता तालकातोरा इन्डोअर स्टेडियम, नविदिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
     सदर कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विन चौबे, खा. सी. पी. जोशी, खा. मनोज तिवारी, तसेच अ. भा. ब्राह्मण महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.