कोथळी येथील बुलडाणा अर्बन बँकेत व्यवस्थापक-लिपीकाच्या संगनमताने 1 कोटी 37 लक्ष रुपयाची चेरीमिरी
* बोराखेडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
मोताळा : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील कोथळी येथील बुलडाणा अर्बन को- ऑप क्रेडीट सोसायटी संस्थेच्या शाखेत 1 कोटी 37 लक्ष 59 हजार रुपयांवर व्यवस्थापक-लिपीकाच्या संगनमताने चेरीमिरी झाल्या प्रकरणी तीन आरोपींवर 6 फेब्रुवारी रोजी सचिन झंवर यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्या. बुलडाणा पतसंस्थेच्या कोथळी शाखेत व्यवस्थापक सुनिल गांधी, लिपीक सतिष राठी व मधुकर सावळे यांनी संगनमताने कोथळी संस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी शाखेत जमा न करता बनावट नोंदी करून ते शाखेत जमा झाल्याचे ठेवीदारांना भासविले. खातेदारांचे सेव्हींग खात्यावरील पैसे त्यांच्या मुदत ठेव खात्यावर वेळेत न करता शाखेतील इतर खात्यावर वळती करुन 1 कोटी 37 लक्ष 59 रुपयांची चेरिमिरी केल्याने सचिन झंवर यांच्या फिर्यादीवरुन 6 फेब्रुवारी 2023 रोजी सुनिल गांधी, सतिष राठी व मधुकर सावळे यांच्यावर बोराखेडी पोस्टे. ला भादंवीचे कलम 409, 420, 465, 471, 34 अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे.