एल्गार मोर्चाला आमचा पूर्ण पाठिंबा : आ. डॉ. राजेंद्र शिंगणे* रविकांत तुपकर यांची भूमिका शेतकरी हिताची

एल्गार मोर्चाला आमचा पूर्ण पाठिंबा : आ. डॉ. राजेंद्र शिंगणे
* रविकांत तुपकर यांची भूमिका शेतकरी हिताची
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
           शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी ६ नोव्हेंबर 2022 रोजी बुलढाण्यात शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते माजीमंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची भूमिका शेतकरी हिताची असून आमचे त्यांना समर्थन असल्याचे आ. डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
           राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने शिर्डी येथे दोन दिवशीस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराबाबत माहिती देण्यासाठी २८ ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत आ. डॉ. राजेंद्र शिंगणे बोलत होते. राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित दोन दिवशीय अभ्यास शिबिराबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. दरम्यान सध्या जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड हवालदिल असून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबर 2022 रोजी भव्य एल्गार मोर्चा काढला जाणार आहे, या मोर्चाबाबत आ. डॉ. शिंगणे यांना विचारणा केली असता त्यांनी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आयोजित या मोर्चाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. रविकांत तुपकर यांची भूमिका शेतकरी हिताची असून शेतकऱ्यांसाठी पक्षभेद वाजूला ठेऊन या मार्चाला राष्ट्रवादीचे समर्थन असल्याचे आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे परंतु अद्याप पंचनामे नाही, नुकसान भरपाई नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदत देईल असे वारंवार सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीत पडत नसल्याचे दुर्दैवी वास्तव आहे. त्यामुळे दिवाळीला राष्ट्रवादीने चटणी भाकर आंदोलन केले आणि यापुढेही शेतकरी हितासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरण्यास तयार आहे, असे यावेळी आ. डॉ. शिंगणे यांनी सांगितले.