निराधार व विधवा भगिनीसोबत दांडगे परिवाराने साजरी केली दिवाळी* साडी,पातळ,चोळी व फराळ वाटप करून दिली भाऊबीज भेट* व्हिडिओ कॉलद्वारे मनोज दांडगे यांनी दिल्या शुभेच्छा

निराधार व विधवा भगिनीसोबत दांडगे परिवाराने साजरी केली दिवाळी
* साडी,पातळ,चोळी व फराळ वाटप करून दिली भाऊबीज भेट
* व्हिडिओ कॉलद्वारे मनोज दांडगे यांनी दिल्या शुभेच्छा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांच्या संकल्पनेतून त्यांचे बंधू संतोष दांडगे, उमेश दांडगे व दांडगे परिवाराने बुलडाणा तालुक्यातील जामठी येथील निराधार व विधवा महिलांना साडी,पातळ,चोळी व फराळाचे वाटप करून दिवाळी साजरी केली.
     यावेळी शालिग्राम पांडुरंग तायडे, सिताराम लक्ष्मण तायडे, शालिग्राम काशिबा तायडे, संतोष दांडगे,जामठी शेकापूर गट ग्रामपंचायतचे सरपंच बिलाल गायकवाड, उपसरपंच कौतिकराव नरोटे, उमेश दांडगे,राष्ट्रवादीचे नेते नसीम शेठ, निलेश देठे, निर्मलाताई तायडे,राजू नागवे पाटील,गणेश नरवाडे पाटील, प्राचार्य संतोष डवले,  तुळशीराम काळे, संजय जाधव, शरद ताठे पाटील, नंदू रत्नपारखी, दिलीप पांडव, रामू कचाटे पाटील,योगेश हिवाळे, पिंटू आंबेकर, गजानन इंगळे,अंबादास बावस्कर, राहुल वाघ, उमेश सिनकर साहेब, गजानन नरोटे, दिनकर बापू देशमुख,महेंद्र कड, गणेश गायकवाड, माजिद भाई आदी उपस्थित होते.