बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
येथील रहिवासी व तालुक्यातील तराडखेड येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रकाश पायघन यांचा मुलगा समर्थ पायघनची आयआयटी मुंबई येथे इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग साठी पहिल्या फेरीत निवड झाली आहे.
येथील शारदा ज्ञानपीठचा विद्यार्थी असलेल्या समर्थ पायघनने सरस्वती क्लासेसमध्ये शिक्षक उबरहंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनचा कोर्स केला होता. त्यानंतर कोटा राजस्थान येथून रिलायबल इंन्स्टीट्युटमध्ये दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून जगातील सर्वात कठिण समजली जाणारी जेईई ॲडव्हास परीक्षेत घवघवीत यश मिळविले. या परीक्षेत समर्थने ऑल इंडिया ११२४ रँक तर ओबीसी गटात १५८ रँक मिळवून देशातील सर्वात प्रथम क्रमांकाची आयआयटी मुंबईसाठी निवड सिध्द केली आहे. या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित समर्थ पायघनचा सत्कार करण्यात आला.