राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते सुरुवात

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते सुरुवात
खामगाव : (एशिया मंच वृत्त)
        खामगाव तालुक्यातील रोहणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा पंधरवाड्यास केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते सुरुवात झाली. 
       केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड लसीकरण भेट देऊन रक्तदान शिबिराचे उद्घाटन आणि वृक्षरोपण केले.
यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार चैनसुख संचेती, सागर फुंडकर उपस्थित होते.
      यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, तसेच रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. यादव यांच्या हस्ते महिला बचतगटांना धनादेश व महसूल विभाग कडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे दाखले व शिधापत्रिकाचे वितरण करण्यात आले.
        रोहणा येथील कार्यक्रमात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाडा अंतर्गत विविध शासकीय उपक्रमांस सुरुवात करण्यात आली. यात लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण तसेच महसूल विभागाकडून देण्यात येत असलेले विविध दाखले व महिला बचत गटांना व्यवसायासाठी अर्थसाहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमात प्रधानमंत्री मातृवंदन घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी प्रतिनिधी स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
        यावेळी तालुका आरोग्य अधिकारी खामगाव डॉ. अभिलाष खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम उबरहंडे, डॉ. पानझाडे, डॉ. अजबे, डॉ. मगर, चंद्रकांत धुरंधर, सुरेश सोनपसारे, अनिल भोके, श्रीमती बगाडे, गजानन लोड, श्री. गिऱ्हे, बी.एस. वानखडे आदी उपस्थित होते.