लद्धड अभियांत्रिकीमध्ये श्रेयांक पद्धत व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० यावर एकदिवसीय कार्यशाळा

लद्धड अभियांत्रिकीमध्ये श्रेयांक पद्धत व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० यावर एकदिवसीय कार्यशाळा 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
         येत्या काळात नवीन शैक्षणिक धोरण २०२० येवू घातले आहे. सीबीसीएस अभ्यासक्रम हा त्यातीलच एक भाग आहे. व तो या चालू सत्रापासून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाला लागू केलेला आहे. त्याची सर्व माहिती उच्च शिक्षणातील सर्व घटकांना व्हावी म्हणून विद्यापीठामार्फ़त १७ सप्टेंबर 2022 ला एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हि कार्यशाळा एकाच वेळेस विद्यापीठातील सर्व महाविद्यालयासाठी आयोजित करण्यात आली होती. यासाठी विद्यापीठातील ७0 महाविद्यालयाची निवड केली असून त्यात बुलडाणा येथील लद्धड अभियांत्रिकी येथे ११ महाविद्यालयासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पंकज लद्धड इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि अँड मेनजमेंट स्टडीज, महात्मा जोतिबा फुले कॉलेज ऑफ सोसिअल वर्क, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन, महात्मा गांधी बी.एड कॉलेज, कादरीया कॉलेज ऑफ एज्युकेशन, मुकुल वासनिक लॉ. कॉलेज, लद्धड कॉलेज ऑफ फार्मसी, राजषी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, मॉडल डिग्री कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयातील सर्व प्राध्यपक व आजी माजी तासिकेवरील शिक्षक व व्यवस्थापणाचे प्रतिनिधी यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.
      स्थानिक उद्घाटन सत्र हे १० वाजता चालू झाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिपकजी लद्धड, सहसचिव रविंद्रजी लद्धड तसेच प्रमुख पाहुणे तज्ञ प्रशिक्षक डॉ. गजेंद्र बमनोटे, प्राचार्य, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, अमरावती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. जावंधिया त्याच प्रमाणे सर्व अकरा महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक वर्ग उपस्तिथ होते.
        कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य डॉ पी. एम. जावंधिया यांनी आपल्या प्रस्थाविका मध्ये श्रेयांक पद्धत व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यावर थोडक्यात माहिती सांगितली. उपस्थित शिक्षकांना संबोधित करतांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिपकजी लद्धड यांनी विद्यार्थी व शिक्षक हे परस्परांना पूरक असल्याचे नमूद केले. जेणे करून कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ साधता येईल. मुख्य उद्घाटन सत्र हे १०.३० वाजता आभासी प्रक्षेपणाद्वारे झालें. नंतर प्र – कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांचे स्वागतपर मनोगत आणि प्रास्ताविक, विशेष अतिथी विकास चंद्र रस्तोगी प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे, मा. अध्यक्ष, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे संबोधन, प्रमुख अतिथी चंद्रकांतदादा पाटील, मा. मंत्री महोदय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे संबोधन, विशेष अतिथी मा. श्री. भगतसिंहजी कोश्यारी महामहिम राज्यपाल तथा कुलपती यांचे संबोधन, अध्यक्ष प्रा. दिलीप मालखेडे, मा. कुलगुरू यांचे संबोधन, डॉ. तुषार देशमुख, कुलसचिवयांचे आभार प्रदर्शन झालें.
     त्यानंतर झालेल्या त्रिसत्रीय मार्गदर्शना मध्ये प्रथम सत्रात तज्ज्ञ वक्त्यांनी श्रेयांक पद्धत व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, शैक्षणिक अभ्यासाचा एकत्रित अभ्यासक्रम, ब्लूमचे वर्गीकरण याबद्दल माहिती दिली. द्वितीय सत्रात प्रेरण कार्यक्रम, तज्ज्ञांनी क्षमता आधारित अभ्यासक्रमवार प्रकाश टाकला तसेच भोजन अवकाशानंतर तिसऱ्या सत्रामध्ये रोजगार क्षमता, अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट अँड कॉन्व्हेंशन ऑफ मार्क टू ग्रेड सिस्टिम या विषयावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रानंतर उपस्थितांसोबत परस्परसंवादाचे आयोजन करून शंकांचे निरासरण करण्यात आले.  
       कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या प्राध्यापकांना मुख्यअतिथी डॉ. गजेंद्र बामनोटे,प्राचार्य, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, अमरावती., डॉ. सीमा लिंगायत,प्राचार्य, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन, बुलढाणा, प्रो..ए. पी. कंकाळ प्राचार्य, राजर्षी शाहू इंजिनीरिंग कॉलेज,बुलढाणा,प्रो.एन ए.गायकवाड प्राचार्य,महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोसिअल वर्क, बुलढाणा,प्रो.शिल्पा ठाकरे प्राचार्य,मुकुल वासनिक लॉ. कॉलेज,बुलढाणा यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयातील प्रा. जागृती चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सचिन दांडगे, प्रा. आशिष हरकुट , प्रा. विठ्ठल नवले, प्रा. स्वप्नील देशमुख, प्रा. प्रियंका खर्चे, प्रा. प्रियंका रसाळ, प्रा. सचिन राऊत यांच्या मार्गदर्शनात श्री. संजय खडसे, श्री. शंकर गार्डे, श्री. संदीप येवले, श्री. अरुण भालेराव, श्री. अभिजीत भालेराव, श्री. विजय मिसाळ, श्री. धनंजय श्रीनाथ, कु. प्रियंका राजपूत यांनी परिश्रम घेतले.
        सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ .दिपकजी लद्धड, सचिव डॉ .संगीताजी लद्धड, सहसचिव श्री. रविंद्रजी लद्धड व कोषाध्यक्ष सौ . अर्चनाजी लद्धड ह्यांनी कौतुक केले.