* कृष्णात स्वाती यांचे प्रतिपादन
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
शासकीय अद्यापक महाविद्यालय बुलढाणा येथे 'दि रॅशनल थिंकिंग सेल' च्या वतीने विदर्भ स्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन अभियान बुलढाणा जिल्हा अंतर्गत ' अंधश्रद्धा निर्मूलन 'या विषयावर स्थानिक शासकीय अध्यापक महाविद्यालय , बुलढाणा विशेष व्याख्यान 19 सप्टेंबर 2022 रोजी केले होते.
शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा येथील व्याख्यान सभागृहात कृष्णात स्वामी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले .सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणाच्या प्राचार्या डॉ.सौ.सीमा लिंगायत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक सुरेश साबळे, पंजाबराव गायकवाड उपस्थित होते. सोबतच प्रमुख उपस्थितीत शासकीय अद्यापक महाविद्यालय बुलढाणा येथील प्रा.डॉ.एन.बी.चव्हाण, प्रा.डॉ अनिल वरघट, प्रा.डॉ.हर्षानंद खोब्रागडे , प्रा.सुनील खडसे, प्रा. संजीवींनी सोनवणे होते.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी कृष्णात स्वामी मार्गदर्शन करताना म्हणाले की, सर्व युवा विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांनी जीवन जगत असताना विवेकी विचार जोपासत, वैज्ञानिक विचारांची रुजवणूक करून संवर्धन करणे गरजेचे आहे. पुढे म्हणाल्या की , मानवतावादी दृष्टिकोन जोपासत समाजात कायम स्वरूपी अस्तित्वात असणारा बदल घडला पाहिजे. मानवतावादी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवत प्रबोधन करणे हे अत्यंत गरजेचे आहे व जागृत नागरिक म्हणून आपण सदैव प्रयत्न करायला हवेत.भावी शिक्षक म्हणून बि. एड. प्रशिक्षणार्थी यांनी विज्ञानाची कास धरत समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्यापक प्रमाणात कार्य करून नव राष्ट्र घडवावे, असे आव्हान यावेळी केले व संवाद साधून प्रशिक्षणार्थीं यांच्या शंका -प्रश्न यांचे निराकरण केले.
सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक दि रॅशनल थिंकिंग सेल चे समनव्यक प्रा. डॉ. हर्षानंद खोब्रागडे होते. या शैक्षणिक कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बी. एड. प्रशिक्षणार्थी कु.प्रीती गवई यांनी केले. प्रास्ताविक दि रॅशनल थिंकिंग सेल चे समनव्यक प्रा.डॉ. हर्षानंद खोब्रागडे यांनी केले. स्वागतगीत कु.दीपाली फोकमारे व चमू यांनी सादर केले.यावेळी सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने अक्षय सपकाळ यांनी गीत सादर केले.आभार प्रदर्शन दि रॅशनल थिंकिंग सेल चे महाविद्यालयीन सचिव सुदर्शन बनसोड यांनी केले.