संघर्ष महर्षी उजवणे यांच्या 95 व्या जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर* मेहकर तलाठी संघटने चा उपक्रम

संघर्ष महर्षी उजवणे  यांच्या 95 व्या जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर
*  मेहकर तलाठी संघटने चा उपक्रम 
मेहकर : (एशिया मंच वृत्त)
        विदर्भ पटवारी संघ तालुका मेहकर यांच्या वतीने  20 सप्टेंबर रोजी तलाठी संघटना मेहकर च्या वतीने  कै. संघर्ष महर्षी वि. मी. उजवणे साहेब यांच्या 95 व्या जन्मोत्सवा निमित्त तहसील कार्यालय मेहकर येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मेहकर तहसीलचे तहसीलदार डॉ. संजयजी गरकल यांनी रक्तदान करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
   
    विदर्भ पटवारी संघ नागपूर तालुका शाखा मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी संघर्ष वि.म.उजवने साहेब यांचे 95 व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात तलाठी  , मंडल अधिकारी, कोतवाल, तहसील कर्मचारी, यांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष विजेंद्रजी धोंडगे साहेब बुलढाणा यांचे मार्गदर्शन लाभले. 
     या शिबिरामध्ये 22 रक्तदात्यानी केले. या रक्तदान
शिबिराला जीवनधारा बुलढाणा अर्बन ब्लड बँकेची टीम होती. 
    सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश बाजड उपविभाग सचिव शिवशंकर निकस, सर्व मंडळ अधिकारी तलाठी विजय गारोले, माधवराव गायकवाड, निलेश डहाके, बालाजी तिरके, पंजाब मेटागले, अजय शेवाळे, लक्ष्मण  सानप, म्हस्के साहेब, अमोल राठोड सर्व तलाठी कोतवाल व महसूल कर्मचारी यांनी आयोजन करून परीश्रम घेतलें.