* 150 जणांनी घेतला डिजिटल फोटो चा लाभ
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुलडाणा येथील वैभव झेरॉक्स प्रतिष्ठाणचे संचालक तथा नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक दत्तात्रय देशमुख उपाख्य बाप्पू यांनी रविवार 18 सप्टेबर 2022 रोजी येणा-या ग्राहकांना दहा डिजिटल फोटो मोफत काढून देण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला.
या संधीचा परिसरातील नागरिकांनी तसेच कामा निमित्त येणाऱ्या युवक वर्गाने मोठ्या संख्येने लाभ घेतला. पास पोर्ट फोटोचा आजच्या धका- धकीच्या काळात फार नितांत गरज भासत असलण्याने वैभव झेरॉक्स चे संचालक यांनी ही बाब हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या नमित्ताने हा उपक्रम राबविला. या पास पोर्ट फोटोचा बँक, मोबाईल सिम कार्ड तसेच अनेक कामामध्ये उपयोगी पडते. यामध्ये 100-150 लोकांनी डिजिटल फोटो काढून या संधीचा लाभ घेतला.