बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज 4 फेब्रुवारी 2022 रोजी सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक मोती तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष ॲड नाझेर काझी, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, वंशज शिवाजीराजे जाधव, नागपूर येथील पुरातत्व संचालनालयाच्या जया वहाणे, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वंशज शिवाजीराजे जाधव यांनी तलावाच्या बांधकामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. या तलावातून होणाऱ्या सिंचन व्यवस्थेची रचना तसेच तलावातील अतिरिक्त पाण्याचे सांडव्यातून होणारे निचरा व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. या तलावाच्या पर्जन्य क्षेत्रात वृक्ष लागवड करावी. तसेच तलाव परिसरात वृक्ष लागवड व संवर्धन करावे, असे निर्देश राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
