सिंदखेड राजा : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील साखरखेर्डा येथील नाईकवाडी पुऱ्यात वास्तव्यास असलेल्या शे अन्सार शे शकुर (38) यांचा विजेच्या धक्काने जागेवर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी 8 जानेवारी रोजी सायंकाळी घडली.
घरी नळासाठी मोटार लावत असताना अन्सार यांना जोरदार शॉक बसला दरम्यान त्यांना तातडीने उपचारार्थ हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचेवर रविवारी सकाळी शोकाकूल वातावरणात मुस्लिम कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला त्याचे मागे दोन भाऊ, आई, पत्नी तीन मुले असा आप्त परिवार आहे. अन्सार हा बांधकाम ठेकेदार होता.