बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्ह्यातील मलकापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी त्यागी यांनी मलकापूर एमआयडीसी परिसरात अवैध पद्धतीने सुरु असलेल्या बायोडिजलच्या प्लांटवर २३ डिसेंबरला छापा मारून कारवाई केली होती, मात्र या प्रकरणात ७ दिवस उलटुनही गुन्हे दाखल न झाल्यामुळे टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष तथा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी वसीम शेख यांनी मलकापूर तहसीलदार यांना ३० डिसेंबर रोजी फोन करुन पोलीसात गुन्हा का दाखल झाला नाही ? असे विचारले असता तपासणीसाठी पाठवलेले नमुन्याचे अहवाल येताच पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी ६ जानेवारीला पत्रकार वसीम शेख यांना दुपारी मलकापूर येथील हफ्तेखार नामक बायो-डिजल माफियाने मोबाईल वरून म्हटले की, माझे बायोडिजलचे पंप बंद झाले आहे. आणि अश्लील भाषेत बोलत हातपाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी पत्रकार वसीम शेख यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यांनतर याच माफियाने मलकापूर शहरातील गजानन ठोसर यांना हि याच बायोडीझल माफियाने फोनवरून धमकी दिली यानंतर मलकापुरातील पत्रकारांनी रात्री पोलीस स्टेशनला पोहचून तक्रार नोंदवल्यावरून आरोपी इफ्तेखार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज पत्रकारांच्या शिष्टमंडळाने बुलडाण्यात पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक,अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेवून सदर प्रकरणात आरोपीस अटक करून त्याचेवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्याची आग्रही मागणी केली. यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी लगेच भ्रमणध्वनीवरून मलकापूर ठाणेदार काटकर यांच्याशी संपर्क साधुन आणि बैठकीत उपस्थित बुलडाणा शहर ठाणेदार ताथोड यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.
पत्रकारांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनावर पत्रकार सर्वश्री चंद्रकांत बर्दे, भानुदास लकडे, संजय जाधव, संदीप शुक्ला, संजय काळे, पुरुषोत्तम बोर्डे, बाबासाहेब जाधव, संदीप वानखडे, वसिम शेख, निलेश राउत, गणेश निकम, युवराज वाघ, लक्ष्मीकांत बगाडे, कासिम शेख, शिवाजी मामलकर, सचिन लहाने, नितिन शिरसाट, पवन सोनारे, सुनिल तिजारे, गणेश सोळंकी, संदीप वंत्रोले, रणजीतसिंग राजपूत, फहीम देशमुख, राजवर्धन शेगांवकर, दिपक मोरे, राहुल खंडारे, प्रफुल्ल खंडारे, संतोष मलोसे, प्रशांत सोनोने,गजानन ठोसर, विरसिंह राजपूत, समाधान सुरवाडे, दिपक इटनारे, किशोर राऊत, वैभव मोहिते, राजेश इंगळे, शौकत शाह, शेख आसिफ आदी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.