निवडणूक आली म्हणून पावसाळी बेडका प्रमाणे उगावणाऱ्या कडे दुर्लक्ष करा * मासरूळ जि. प. सर्कलमध्ये विकासरथ अव्याहत चालणार - जालिंधर बुधवत

निवडणूक आली म्हणून पावसाळी बेडका प्रमाणे उगावणाऱ्या कडे दुर्लक्ष करा 
* मासरूळ जि. प. सर्कलमध्ये विकासरथ अव्याहत चालणार - जालिंधर बुधवत

बुलडाणा :(एशिया मंच वृत्त)
      फळ लागलेल्या झाडाला दगड मारण्याची सवय लोकांना असते. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप करणार्‍यांकडे कानाडोळा आपण केला पाहिजे. विकासकामांमध्ये राजकारण आपण आड़ येऊ देत नाही आणि जे काम करतो त्यावरच बोलतो. निवडणुका आल्या म्हणजे पावसाळी उगवणार्‍या बेडकासारखे काही जण या भागात फिरत असतात. त्याकडे साफ दुर्लक्ष करा. शिवसैनिक पाच वर्षच काय तर कायम जनसेवेत अग्रेसर असतात, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी केले.
      मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील मौजे टाकळी येथे खा. प्रतापराव जाधव व आ. संजुभाऊ गायकवाड यांच्या सहकार्याने तसेच बुलडाणा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. कमलताई बुधवत यांच्या माध्यमातून मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील मौजे टाकळी येथील अंगणवाडी खोली लोकार्पण, स्वच्छता गृह लोकार्पण, व सिमेंट रस्ता भूमिपूजन अशा एकूण 18  लक्ष विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते  16 जानेवारी 2022  रोजी संपन्न झाले. 
     यावेळी जालिंधर बुधवत बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मासरूळ जि. प. सर्कलमध्ये झालेल्या विकासकामांचे लोकार्पण व प्रस्तावित कामांच्या भूमिपूजनचा झंझावात सुरू आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून ते खोटे नाटे आरोप -प्रत्यारोप करत आहे. परंतु असे कितीही आरोप झाले तरी आपण त्याला भिक घालत नाही. यापुढेही मासरूळ जि. प. सर्कलमध्ये विकासाचा रथ सतत चालू ठेवणार असल्याचे मनोगत जालिंधर बुधवत यांनी यावेळी व्यक्त केले. 
       यावेळी पं. स. सदस्य दिलीप सिनकर, पं. स. मा. सभापती सुधाकर आघाव, तालुका प्रमुख लखन गाडेकर, उप ता. प्र. अमोल शिंदे, विजय इतवारे,  डॉ. अरुण पोफळे, युवा सेना सन्वयक राजू मुळे,   दादाराव महाले, रामेश्वर बुधवत, एकनाथ वाघ, राजू पालकर, संदीप पालकर, रामेश्वर पालकर, नारायण यंगड, अनिल शिंदे, विशाल कऱ्हाडे, गजानन धंदर, सतीश धंदर, मधुकर महाले, योगेश पायघन, भानुदास आघाव, अनंता वाघ, कडूबा इंगळे, गजानन गवळी, समाधान बुधवत, रवी गोरे, प्रभाकर मघाडे, शेषराव बुधवत, दीपक दराडे, तसेच टाकळी येथील उमाजी शिंबरे, जानराव नागवे, पंजाबराव शिंबरे, विशाल शिंबरे, श्रीकृष्ण गोराडे, बाळु उगले, सुनील उगले, शालीकराम गोराडे, कडूवा नागवी दिलीप शिंबरे, प्रकाश शिंबरे, भोलू शिंबरे, देविदास शिंबरे, राजू जगताप, विनोद गोराडे, देविदास तायडे, किसन तायडे, नंदू जगताप, सुधाकर नागवे, गजानन कोलते, अंबादास शिंबरे, किसन गोराडे, दिलीप उगले, रमेश कोलते, पांडुरंग तायडे, गणेश शिंबरे, सांडू काळे, विजय गोराडे, दिलीप गोराडे, समाधान गोराडे, रामभाऊ नागवे, विष्णू गोराडे, गजानन कोलते, देविदास बोराडे, दादाराव शिंबरे, संदीप शिंबरे, गणेश तायडे, रामभाऊ उगले, जीवन कोलते, समाधान नागवे, अंजुम शेख, अमोल शिंबरे, इकबाल शेख, नम्मू शेख, नितीन शिंबरे, विठ्ठल गोराडे, संजय सुस्ते, बाळु सुस्ते, प्रल्हाद गोराडे, रामेश्वर गोराडे, प्रवीण गोराडे, सचिन नागवे, संदीप शिंदे, अमोल शिंदे, विजय उगले, पांडुरंग नागवे, श्रीरंग भोंडे, महादू गोराडे, भगवान पांडे, सुरेश काळे, विष्णू गोराडे, कौतिक शिंबरे, केशव शिंबरे, शरद शिंबरे, गजानन उगले, गजानन नागवे, श्याम शिंबरे, कडूबा कोलते यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, टाकळी येथील महिला भगिनी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.