* अदिती अर्बन परिवाराच्या वतीने मुलांच्या वसतिगृहाचे नूतनीकरण
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिजामाता महाविद्यालय,बुलडाणा येथे मुलांच्या वसतिगृह इमारतीच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन अदिती अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी, बुलडाणा चे संस्थापक अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरेश देवकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, 'गाव- खेड्यालीत शेतकरी कष्टकरी कुटुंबातील मुला-मुलींना उच्च शिक्षणाची दारं खुली व्हावी हा स्व. डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या शैक्षणिक चळवळीचा मुख्य उद्देश होता. विदर्भाची ज्ञान गंगोत्री म्हणून श्री.शिवाजी शिक्षण संस्था ओळखली जाते.
ग्रामीण भागातील तरुणांना शहरात राहून शिक्षण घेतांना असंख्य अडचणी येतात. त्या आपण अनुभवलेल्या आहेत. म्हणून अशा होतकरू विद्यार्थ्यांची निवासाची सोय आधुनिकरित्या रम्य , प्रशस्त व सुसज्ज व्हावी याकरीता या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून मी स्वतः आणि आमचा अदिती अर्बन परीवार सदैव आपल्या सोबत आहोत. या महाविद्यालयाशी सदैव ऋणानुबंध जोपासून सेवेशी कृतिशील कटीबद्ध-वचनबद्ध आहोत, या महाविद्यालयात माझी प्रगतीपर यथोचित जडण-घडण झाली. या महाविद्यालयासाठी काही करता येणं ही, मी माझं सौभाग्य समजतो' असे सुरेश देवकर याप्रसंगी बोलतांना म्हणाले.
जिजामाता महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहाच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरणाचे संपूर्ण काम सुरेश देवकर यांनी आपल्या अदिती अर्बनच्या वतीने पूर्ण करून देण्यासाठी पुढाकार घेऊन आज प्रत्यक्ष कामास सुरुवातही केली.
सदर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ. प्रशांत कोठे होते. ' सुरेश देवकर यांच्यासारखे यशस्वी व दायित्व भावना जोपासणारे माजी विद्यार्थी हीच महाविद्यालयाची श्रीमंती असून त्यांचा सर्व विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा' असे डॉ.कोठे यांनी अध्यक्षीय मनोगतातून सांगितले. याप्रसंगी अदिती अर्बनचे कार्यकारी संचालक दिनकरराव चिंचोले, जिजामाता महाविद्यालयाचे प्रा.सुबोध चिंचोले, प्रा.ए.एस.पाटील, डॉ.भरत जाधव, प्रा.डॉ.एम.डी जाधव, डॉ.अनंतराव सिरसाट, डॉ.श्रीराम येरनकर, डॉ.ई.जे. हेलगे, डॉ.सौ.वंदना काकडे , डॉ.एस.आर.इंगळे, प्रा.संजय सोनुने, प्रा.आत्माराम राठोड, प्राध्यापक वृंद तसेच अदिती अर्बन परिवारातील मार्गदर्शक अभिजित पाटील, मुख्य वसुली अधिकारी अनिरुद्ध गायकवाड, विभागीय अधिकारी मदन निकम, पंकज शेजोळ, समाधान गवई, संजय वानखेडे, राजू वैद्य, इंजिनियर सचिन जायभाये, प्रा.राहुल हिवाळे मुख्य जनसंपर्क अधिकारी आदी कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आभार प्रदर्शन जिजामाता महाविद्यालयाचे प्रा.सुबोध चिंचोले यांनी केले.
